Shashank Ketkar: शशांक केतकरला लागली लॉटरी! करण जोहरच्या ‘या’ बिग बजेट प्रोजेक्टमध्ये झळकणार-shashank ketkar casted in karan johar upcoming project web series show time ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shashank Ketkar: शशांक केतकरला लागली लॉटरी! करण जोहरच्या ‘या’ बिग बजेट प्रोजेक्टमध्ये झळकणार

Shashank Ketkar: शशांक केतकरला लागली लॉटरी! करण जोहरच्या ‘या’ बिग बजेट प्रोजेक्टमध्ये झळकणार

Feb 13, 2024 12:46 PM IST

Shashank Ketkar in Karan Johar Project: मराठी मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता शशांक केतकर आता बॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण करत आहे.

Shashank Ketkar in Karan Johar Project
Shashank Ketkar in Karan Johar Project

Shashank Ketkar in Karan Johar Project: ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘श्री’ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर सध्या यशाच्या शिखरावर आहे. शशांक केतकर याने काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांना घर आणि गाडी घेतल्याची आनंदाची बातमी दिली होती. या आनंदाच्या बातमी शशांक केतकर याचे चाहते खुश असतानाच आता त्याने पुन्हा एकदा चाहत्यांना एक गोड बातमी देत, सुखद धक्का दिला आहे. नुकतीच त्याने एक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. यात त्याने आपण करण जोहरच्या आगामी बिग बजेट प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचे म्हटले आहे.

अभिनेता शशांक केतकर याने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’च्या ऑफिसमध्ये उभा असलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शशांक केतकर याच्या हातात कॉफी मग देखील दिसत आहे, ज्यावर ‘धर्म्याटीक’ असे लिहिले आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना शशांक केतकरने लिहिले की, ‘शो टाईम! ८ मार्च पासून फक्त डिस्नेप्लस हॉटस्टारवर... जेव्हा धर्माच्या ऑफिसमध्ये मिटिंगसाठी जाता तेव्हा.. कुछ कुछ होता है... काम छोटं आहे, पण लक्षात राहण्यासारखं आहे.’

Sadhi Mansa: एकाच गोष्ट गुंफली जाणार दोन टोकाची पात्र; ‘साधी माणसं’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बजेट प्रोजेक्टमध्ये झळकणार दिग्गज कलाकार!

या पोस्टमधूनच लक्षात येत आहे की, अभिनेता शशांक केतकर आता प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी बिग बजेट प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. करण जोहर सध्या त्याच्या ‘शो टाईम’ नावाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याच वेब सीरिजमध्ये शशांक केतकर झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये शशांक केतकर याची छोटीशी भूमिका असली तरी, ती दमदार असणार आहे. येत्या ८ मार्चला ‘शो टाईम’ ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. करण जोहरच्या ‘शो टाइम’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मौनी रॉय, श्रिया सरन, महिमा मकवाना, अभिनेता इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, राजीव खंडेलवाल यांसारखे कलाकार दमदार भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

शशांक केतकर सध्या काय करतोय?

मराठी मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता शशांक केतकर आता बॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण करत आहे. शशांक केतकर सध्या ‘मुरंबा’ या मालिकेत झळकत असून, या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तेलगी घोटाळ्यावर आधारित ‘स्कॅम २००३’ या वेब सीरिजमध्ये देखील त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

Whats_app_banner