बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'मुंज्या' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी पासूनच चर्चेत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आता आठ दिवसात किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकदम हळू हळू कमाईची सुरुनात केली. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या या चित्रपटा आठ दिवसात चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ४ कोटी कमावले होते. त्यानंतर चित्रपट ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर चित्रपटाने ८ कोटी कमावले. आता आठ दिवसात चित्रपटाने जवळपास ३८.६५ कोटी रुपयांची केली आहे. या चित्रपटाची चौथ्या दिवशी ४ कोटी, पाचव्या दिवशी ४.१५ कोटी, सहाव्या दिवषी ३.९ कोटी, सातव्या दिवशी ४ कोटी कमावले. एकंदरीत चित्रपट चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे.
वाचा: संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले
'मुंज्या' या चित्रपटाचे बजेट हे ३० कोटी आहे. दोन दिवसातच चित्रपटाने १० कोटी कमावल्यामुळे चित्रपटाला नफा होणार असल्याचे समोर आले आहे. येत्या काळात चित्रपट आणखी कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपट ५० कोटी कमावणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्माते आणि कलाकारांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेतली.
वाचा: फादर्स डे निमित्त 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अक्षय म्हात्रेने वडिलांना दिला खास संदेश
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘मुंज्या’ चित्रपटाला सुपरहिट चित्रपट म्हटले आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली आहे. येत्या काळात चित्रपट आणखी कमाई करु शकतो असे म्हटले आहे.
वाचा: बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका कोणत्या? जाणून घ्या सिनेमांविषयी
'मुंज्या' या चित्रपटात VFXचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. आयएमडीबीने या चित्रपटाला १० पैकी ७.२ रेटिंग दिली आहे. तसेच या चित्रपटात शरवरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज हे कलाकार दिसत आहेत. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे. येत्या काळात चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच चित्रपटाने २० कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे. चित्रपट ५० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या