बॉलिवूडमधील असे काही हॉरर कॉमेडी चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामध्ये स्त्री, गोलमाल ३ आणि आता 'मुंज्या' चित्रपटाचा समावेश झाला आहे. 'मुंज्या' चित्रपटगृहामध्ये अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ आणि अभय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दोन आठवड्यांनंतरही हा चित्रपट चित्रपटगृहात सुरू आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट सर्वजण पाहात आहेत. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे प्रदर्शित होणार हा चित्रपट...
'मुंज्या' हा चित्रपट पाहून प्रेक्षक घाबरले देखील आहेत आणि हसले देखील आहेत. या चित्रपटात मोना सिंग, अभय वर्मा, शर्वरी या कलाकारांनी या चित्रपटात चांगलं काम केलं आहे. दमदार कथा आणि उत्तम अभिनयामुळे हा चित्रपट कार्तिक आर्यन स्टारर चंदू चॅम्पियनलाही टक्कर देत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 'मुंज्या' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे निर्मात्यांना तो ओटीटीवर लवकर आणायचा नाही.
वाचा : लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
प्रेक्षकांना 'मुंज्या' हा चित्रपट घरबसल्या पाहायचा आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. याबाबत निर्माते किंवा कलाकारांकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
वाचा : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का
दिनेश विजान यांनी आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपटांची निर्मिती केली आहे. या यादीमध्ये श्रद्धा कपूरचा स्त्री हा देखील चित्रपट आहे. या चित्रपटात अपूर्ण प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. स्वत:वर प्रेम करणारी रुही दाखवण्यात आली आहे. तर भेडियामध्येही एक लव्हस्टोरी आहे. आता या यादीत मुंज्याच्या लव्हस्टोरीचाही समावेश करण्यात आला आहे. आशा आहे की, या हॉरर चित्रपटाचा दुसरा भागही तयार होईल आणि प्रेक्षकांना मुंज्याची लव्हस्टोरी पाहायला मिळेल.