बॉलिवूडचा नवाब म्हणून अभिनेता सैफ अली खान ओळखला जातो. शाही कुटुंबातील सैफकडे वडिलोपार्जित ८०० कोटी रुपयांचा पतौडी पॅलेज आहे. अनेकदा सैफचे कुटुंबीय व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. या पतौडी पॅलेसमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देखील झाले आहे. आता सैफची बहिण सोहा अली खानने पतौडी पॅलेसविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पतौडी पॅलेसमध्ये अनेक गालिचे का आहेत? तो पेंट करताना काय वापरले जाते? अशा अनेक गोष्टी सोहाने सांगितल्या आहेत.
सोहा अली खानने नुकताच सायरस बरोचाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला पतौडी पॅलेसविषय विचारण्यात आले होते. त्यावर तिने सोहाची आई शर्मिला टागोर या पतौडी पॅलेसच्या प्रत्येक खर्चाचा हिशेब ठेवतात. इतकंच नाही तर रंगरंगोटी प्रचंड खर्चिक असल्यामुळे ती करण्याऐवजी केवळ पॅलेसला चुना मारला जातो असे देखील सांगितले. तसेच गेली अनेक वर्षे पतौडी पॅलेससाठी कोणतही नवी वस्तू घेतलेली नाही असे देखील सोहा म्हणाली. पॅलेसचे आर्किटेक्चर अतिशय सुंदर असल्यामुळे कोणाचेही इतर वस्तूंकडे लक्ष जात नाही.
या मुलाखतीमध्ये सोहाने पतौडी पॅलेसच्या इतिहासाबद्दलही सांगितले. ती म्हणाली, सैफचा जन्म १९७० मध्ये झाला म्हणून तो राजकुमार बनला. त्यानंतर माझा जन्म झाला तोपर्यंत सगळे रॉयल टायटल्स संपले होते. त्यामुळे मला राजकुमारी होता आले नाही. '१९७० मध्ये रॉयल टायटल्स संपल्यावर माझा जन्म झाला. माझ्या भावाचा जन्म १९७० मध्ये झाला म्हणून तो राजकुमार आहे. शीर्षकाबरोबरच बिलाचीही मोठी जबाबदारी आहे. माझी आजी भोपाळची बेगम होती आणि आजोबा पतौडीचे नवाब होते' असे सोहा म्हणाली.
सोहा पुढे म्हणाली की, 'तिचे आजोबा स्पर्धात्मक खेळाडू होते आणि आजीचे वडिल हे त्यांच्यावर थोडे जळायचे. त्यामुळेच आजोबांनी हा आलिशान पतौडी पॅलेस बांधला होता. पण तो बांधत असताना संगमरवरासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना पैशांची कमतरता भासू लागली होती.'
सोहाने सांगितले की, 'कित्येक वर्षे आजोबा आजीवर प्रेम करत होते. पण त्यांना लग्नासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे आजोबांना सासऱ्यांना थोडे इम्प्रेस करायचे होते. जर तुम्ही कधी पतौडी पॅलेसमध्ये गेलात तर जमिनीवर तुम्हाला कारपेट्स दिसतील. कारण आजोबांकडे त्यावेळी मार्बल टाकण्यासाठी पैसे नव्हते. कारपेट उचलून तुम्ही पाहाल तर त्याच्या खाली सिमेंट आहे.'
वाचा: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक
सोहाने या मुलाखतीमध्ये पतौडी पॅलेसमधील आणखी एक रंजक गोष्ट सांगितली आहे. 'हा पॅलेस नीमराणा हॉटेलला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. त्यामुळे आई-वडिलांना तेथे राहण्यासाठी वेगळी अशी खोली ठेवली नव्हती. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी जनरेटर खोली देण्यात आली होती. या खोलीचे रुपांतर २ बेडरुम, हॉल आणि किचनमध्ये करण्यात आले होते' असे सोहा म्हणाली.