मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'संसदेत गदारोळ झाला होता', शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?

'संसदेत गदारोळ झाला होता', शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 27, 2024 08:07 AM IST

Sharmila Tagaor Bikini Photoshoot: १९६६ साली बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते. त्यावेळी संसदेतही बराच गदारोळ झाला होता. आता शर्मिला यांनी बिकिनी फोटोशूटवर तिच्या पतीची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले.

Sharmila Tagore with Mansoor Ali
Sharmila Tagore with Mansoor Ali

शर्मिला टागोर या अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या काळातील रूढीपरंपरा मोडल्या होत्या. १९६६ साली त्यांनी एका मॅगझिनच्या कव्हरसाठी थेट बिकिनी फोटोशूट केले होते. या फोटोशूटने जबरदस्त चर्चा सुरु झाली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी बिकिनी फोटोशूटवर पती मन्सूर अली पतौडी यांची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे. तसेच लग्नाच्या वेळी मन्सूर अली पतौडी यांनाही मर्सिडीज कार भेट दिल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले होते मन्सूर अली पतौडी?

आपल्या पॉडकास्टदरम्यान कपिल सिब्बल यांच्याशी खास संवाद साधताना शर्मिला टागोर यांनी बिकिनी फोटोशूट पाहिल्यानंतर पतीची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले. "माझा नवरा खूप वेगळा होता. तो खूप कमी वेळा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचा. त्याने मला सगळ्याच गोष्टींमध्ये साथ दिली होती. तो अतिशय शांत आणि निर्णय घेणारा होता. तो लंडनमध्ये राहात होता. त्यामुळे इथे काय चालले आहे हे त्यांना कळत नव्हते. त्यांना संसदेतही प्रश्न विचारले गेले, असे मला वाटते. त्यावरून एवढा गदारोळ होईल याची मला कल्पनाही नव्हती. मी लहान होतो, माझी फिगर चांगली होती आणि कोणीही मला हे फोटोशूट करण्यास भाग पाडले नव्हते. कॅमेरामनने मला याबद्दल काही तरी सांगितले होते, पण मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही" असे शर्मिला टागोर म्हणाल्या.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

लग्नात मन्सूर अली खान यांना दिली मर्सिडीज कार

या पॉडकास्टमध्ये बोलत असताना शर्मिला यांनी लग्नाच्या काळाता पती मन्सूर अली खान यांना मर्सिडीज गिफ्ट केल्याचे सांगितले. "ही आमच्या लग्नापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात मर्सिडीज गाडीची किंमत १ लाख रुपये होती. तुम्ही ही कार थेट खरेदी करु शकत नव्हतात. त्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागत होती" असे शर्मिला म्हणाल्या.
वाचा: गौरव मोरेच्या 'अल्ल्याड पल्ल्याड'ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ

ट्रेंडिंग न्यूज

शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांचे लग्न १९६८ साली झाले. शर्मिला यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गुलमोहर' या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शर्मिला यांनी जवळपास १२ वर्षांनी पुनरागमन केले आहे.
वाचा: अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का

WhatsApp channel
विभाग