Shark Tank Season 3: मागील दोन सीझन्सच्या प्रचंड यशानंतर ‘शार्क टँक इंडिया’च्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठीची नोंदणी ३ जूनपासून सुरू झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील उद्योजक, नवोन्मेष्कारी, उत्साही व्यावसायिक यांना सहभागी होण्यासाठी व आपले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आता पुन्हा एकदा एक नवी संधी चालून आली आहे. ‘शार्क टँक इंडियाच्या सीझन २’ने १०३ व्यवसायांमध्ये ८० कोटींची प्रचंड गुंतवणूक करून उद्योजकता वाढीच्या एका मोठ्या लाटेला चालना दिली.
ब्रेकथ्रू तंत्रज्ञानात्मक सोल्यूशन्सपासून ते अत्याधुनिक आरोग्यसेवा नवोन्मेषांपर्यंत या शोमध्ये अनेक अपवादात्मक कल्पना मांडल्या गेल्या. स्टार्टअप्सना यशाची नवीन शिखरे गाठण्यासाठी मदत मिळाली. भाषांमुळे येणारा दुरावा भरून काढण्याच्या उद्देशाने स्थानिक बोलीभाषांवर काम करणाऱ्या स्टेज या नवोन्मेष्कारी ओटीटी प्लॅटफॉर्मने शार्क्सवर आपली छाप पाडली आणि १.५ कोटींचे कर्ज व ०.६ टक्के इक्विटीसाठी १.५ कोटींचा करार यशस्वीरित्या केला. ‘पॅडकेअर’ या मासिकपाळीशी निगडित कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या सेवेने स्त्रियांचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता यांप्रती समर्पण दाखवले. तर, ‘स्निच’ या पुरुषांच्या फॅशन ब्रॅण्डने आपल्या ट्रेण्डी व परवडण्याजोग्या पोशाखांच्या श्रेणीमुळे फाइव्ह शार्क डील पटकावली. भारतातील कचरा व्यवस्थापन हा चिंतेचा विषय होत असताना होम कम्पोस्टिंग ही सवय म्हणून रुजवण्याच्या उदात्त उद्दिष्टामुळे ‘डेली डम्प’ या पुणेस्थित स्टार्टअपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. घरी तयार केलेल्या चवदार खाद्यपदार्थांच्या जोरावर ‘पाटील काकी’ने शार्क्सवर छाप पाडली.
तुमच्याकडेही एखादी चाकोरीबाह्य व्यवसाय कल्पना असेल, प्रस्थापित उद्योग असेल किंवा भरारी घेण्यासाठी उत्सुक असा प्रोटोटाइप असेल, तर ‘शार्क टँक इंडिया सीझन ३’चा मंच खास तुमच्यासाठीच आहे. चला तर, जाणून घेऊया...
शार्क टँक इंडिया सीझन ३ चा नोंदणी अर्ज भरण्यासाठी सोनीलिव्ह अॅप डाउनलोड करा किंवा Sonyliv.com वर लॉग ऑन करा. तुमच्या व्यवसाय कल्पनेचे आकर्षक शब्दांत वर्णन करा, ती कल्पना कशी अनन्यसाधारण आहे आणि तिच्यात किती संभाव्यता दडलेली आहे, यावर प्रकाश टाका. तुमची कल्पना ‘शार्क टँक इंडिया टीम’चे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली, तर तुम्ही पुढील पायरी चढू शकाल.
आता तुम्हाला चमकण्याची संधी मिळाली असेल, तर तुमची व्यवसाय कल्पना गुंतवणूक करण्यास पात्र आहे हे शार्क टँक इंडिया टीमला पटवून देण्यासाठी तुम्ही तीन-चार मिनिटांचे व्हिडीओ पीच अपलोड करू शकता. तुमची कल्पना वेगळी कशी आहे आणि ती यशस्वी होण्याची क्षमता तिच्यात कशी आहे हे दाखवून द्या. शार्क टँक इंडिया सीझन ३ मध्ये सहभागी होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या तुमच्यात आहेत की, नाही ते याच टप्प्यात निश्चित होईल.
प्रारंभिक निवडीचा टप्पा यशस्वीरित्या पार करणाऱ्यांना कठोर ऑडिशन प्रक्रियेतून जावे लागेल. तुमची व्यवसाय कल्पना शार्क टँक इंडिया टीमपुढे प्रस्तुत करा, ते तुमच्या क्षमतेचे मूल्यमापन करतील आणि उमेदवारांमधून सर्वांत उदयोन्मुख उमेदवारांची निवड करतील. उद्योजकतेच्या विश्वातील तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ऑडिशन ही निर्णायक पायरी आहे.
निर्धार आणि स्थितीस्थापकत्वाच्या अंतिम चाचणीसाठी स्वत:ला तयार करा. निवड झालेल्या उमेदवारांना पिचर्स असे संबोधले जाते. ते टँकमध्ये प्रवेश करतील आणि शार्क्सच्या प्रख्यात मंडळाचा सामना करतील. हे अनुभवी गुंतवणूकदार तुमच्या अंतिम पीचचे मूल्यमापन, विश्लेषण करतील आणि त्या आधारे तुम्हाला प्रस्ताव देतील.