Sharda Sinha : बिहार कोकीळा शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sharda Sinha : बिहार कोकीळा शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Sharda Sinha : बिहार कोकीळा शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Nov 06, 2024 07:16 AM IST

Sharda Sinha Passes Away : बिहार कोकिळा व्यतिरिक्त शारदा सिन्हा यांना भोजपुरी नाइटिंगेल, भिखारी ठाकूर सन्मान, बिहार रत्न, मिथिली विभूती सह अनेक पुरस्काराने सन्मानिनत करण्यात आलं आहे. शारदा सिन्हा यांनी भोजपुरी, मगही आणि मैथिली भाषेत लग्न आणि छठची गाणी गायली आहेत जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली.

लोकगायिका शारदा सिन्हा का निधन
लोकगायिका शारदा सिन्हा का निधन

Sharda Sinha Passes Away : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं मंगळवारी रात्री  निधन झालं. त्या गेल्या काही दिवसांनपासून आजारी होत्या.  दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाअखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी सायंकाळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान शारदा सिन्हा यांचं मंगळवारी रात्री  निधन झालं.

प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाले आहे. शारदा सिन्हा आजारी होत्या व  त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांचा मुलगा अंशुमन सिन्हा याने फेसबुक पोस्टद्वारे आई शारदा सिन्हा यांच्या निधनाची माहिती दिली आहे. महापर्व गीते गाऊन प्रसिद्ध झालेल्या शारदा सिन्हा यांचे छठपूजेच्या पहिल्याच दिवशी निधन झाले. शारदा सिन्हा यांचे चिरंजीव अंशुमन सिन्हा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर लिहिले की, त्यांची आई शारदा सिन्हा यांचं थोड्या वेळापूर्वी निधन झालं आहे.  त्यानं लिहिलं की, तुमच्या प्रार्थना आणि प्रेम माझ्या आईसोबत कायम राहतील. इश्वराने आईला स्वतःकडे बोलावलं आहे. आता ती आपल्यासोबत राहिली नाही.

बिहारच्या प्रसिद्ध गायिका 

शारदा सिन्हा यांना २०१८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. छठपूजेवर आधारित शारदा सिन्हा यांच्या 'हो दीनानाथ' या गाण्याला लोकांनी भरभरून दाद दिली. शारदा सिन्हा यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५२ रोजी सुपौल जिल्ह्यातील हुलसा या गावात झाला. बिहार कोकिला व्यतिरिक्त शारदा सिन्हा यांना भोजपुरी नाइटिंगेल, भिखारी ठाकूर सन्मान, बिहार रत्न, मिथिली विभूती सह अनेक सन्मान मिळाले आहेत. शारदा सिन्हा यांनी भोजपुरी, मगही आणि मैथिली भाषेत लग्न आणि छठची गाणी गायली आहेत जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली.

शारदा सिन्हा गेल्या काही दिवसांपासून एम्समध्ये दाखल होत्या. सोमवारी संध्याकाळी शारदा सिन्हा यांना खासगी वॉर्डमधून आयसीयूमध्ये हलवण्यात आले. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शारदा सिन्हा यांची ऑक्सिजन पातळी  कमी झाली होती आणि त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. शारदा सिन्हा मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शनच्या अवस्थेत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारदा सिन्हा यांचे चिरंजीव अंशुमन सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांच्या आईच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी अंशुमन सिन्हा यांना त्यांच्या आईच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास  सांगितलं होतं. यासोबतच पंतप्रधानांनी अंशुमन सिन्हा यांना त्याच्या आईच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील  दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला

प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हाजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांची भोजपुरी लोकगीते अनेक दशकांपासून  लोकप्रिय आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत जगताचे मोठे नुकसान झाले आहे.

Whats_app_banner