Sharad Ponkshe: मराठी स्टारकिड्सचे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण, पहिल्याच चित्रपटात करणार वडिलांसोबत काम
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sharad Ponkshe: मराठी स्टारकिड्सचे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण, पहिल्याच चित्रपटात करणार वडिलांसोबत काम

Sharad Ponkshe: मराठी स्टारकिड्सचे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण, पहिल्याच चित्रपटात करणार वडिलांसोबत काम

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 27, 2024 07:39 AM IST

Sharad Ponkshe Son: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या अनेक स्टारकिड्स पदार्पण करत आहेत. आता मराठीमध्ये देखील अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलाचे पदार्पण होत आहे.

Sharad Ponkshe Son: मराठी स्टारकिड्सचे पदार्पण
Sharad Ponkshe Son: मराठी स्टारकिड्सचे पदार्पण

स्टार किड्स हे सध्या प्रचंड चर्चेत असतात. कधी त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे तर कधी त्यांच्या पदार्पणातील चित्रपटामुळे. या स्टारकिड्सला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण नेहमीच आतुर असतात. त्यांच्या डेब्यू चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक स्टार किड पदार्पण करत आहे. त्याच्या चित्रपटाविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे.

कोण आहे हा स्टारकिड

मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे पदार्पण करत आहे. नुकताच त्यांच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. मात्र यावरील पडदा आता उठला असून त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'बंजारा' असे आहे.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

काय आहे चित्रपटाची कथा

आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा 'बंजारा' हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय. चित्रपटाचे नाव जरी जाहीर झाले असले तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.
वाचा: गौरव मोरेच्या 'अल्ल्याड पल्ल्याड'ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ

शरद पोंक्षेंचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मराठी कलाक्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे शरद पोंक्षे. नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे 'बंजारा' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की !
वाचा: अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का

स्नेहने व्यक्त केल्या मनातील भावना

वडिलांसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, "वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा 'बंजारा' आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.''

Whats_app_banner