शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?

शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 24, 2024 08:01 AM IST

'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी अजून पाहिलेला नाही.

शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?
शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?

सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा अभिनीत आणि दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. पण पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने फारशी कमाई केलेली दिसत नाही. तसेच मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यांनी हा चित्रपट का पाहिला नाही यामागचे कारण देखील समोर आले आहे.

अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांमुळे आणि सावकरांवरील वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. अशातच सावरकरांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेला चित्रपट मराठी तसेच हिंदी भाषेत आहे. मराठी भाषेतील चित्रपटाला अभिनेता सुबोध भावेने आवाज दिला आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डाने केले आहे. प्रेक्षकांनी २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. त्यामध्ये शरद पोंक्षेंचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ

अभिनेते शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी, 'प्रत्येकाने पहायला हवा. मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही. पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: सिद्धार्थ जाधवचं नशीब फळफळलं, 'या' हॉलिवूड सिनेमात साकारणार भूमिका

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटावर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी हा चित्रपट एक प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने प्रचंड मेहनत घेतली. जवळपास त्याने ३० किलो वजन कमी केली. त्याच्या या ट्रांसफॉर्मेशनचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

रणदीपच्या कामाविषी

रणदीपच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा पहिला मराठी चित्रपट आहे. यापूर्वी त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम तेले आहे. त्याचे फारशे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. पण हायवे, राधे, लव आज कल,सुलतान, सरबजीत, किक, मर्डर ३, बॉम्बे टॉकीज, जिम्स २ हे चर्चेत राहिलेले चित्रपट आहेत.

Whats_app_banner