मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. एक काळ असा होता जेव्हा अशोक सराफ यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत होता. त्यांच्या प्रत्येक चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. अशोक सराफ यांनी नुकताच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी त्यांचे आवडते नेते कोण याविषयी देखील वक्तव्य केले आहे.
अशोक सराफ यांनी नुकताच गो. ब. देवल स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण व कलावंत मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. "लोकांना कला आवडत गेली आणि मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे हे खूप महत्वाचे होते. शरद पवार माझे कायमच आवडते नेते आहेत. माझे एक काम होते ते त्यानी तीन मिनिटात करुन दिले होते. मला विश्वास नव्हता, मी म्हटले तिथे बोला. ते म्हटले काम झाले आहे आणि ते खरच झाले. अजूनही ते प्रत्येकाला नावाने ओळखतात. मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते हसले तेव्हा मला ते ओळखतात हे कळाले. दुसऱ्यांदाही भेटले तेव्हाही गर्दीत त्यांनी मला ओळखले. पवार यांनी बरेच काम करून ठेवले आहे, उदय सामंत हे बरेच काही करून दाखवतील याची खात्री आहे" असे अशोक सराफ म्हणाले.
वाचा: बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका कोणत्या? जाणून घ्या सिनेमांविषयी
पुढे अशोक सराफ हे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाले की, 'माझासाठी आनंदाचा क्षण आहे. शब्दात मांडणे कठीण आहे. एका लाईनीत चौथा मिळालेला हा पुरस्कार आहे. हे पुरस्कार कुठून मिळतात, कुणाच्या हस्ते मिळतात हे कायमच महत्वाचे आहे. शासनाचा मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यावेळी मी थोड काय तरी केले आहे असे जाणवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीच्या संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मंगेशकर फॅमिलीतर्फे मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला.'
वाचा: फादर्स डे निमित्त 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अक्षय म्हात्रेने वडिलांना दिला खास संदेश
अशोक सराफ हे लवकरच 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता 'नवरा माझा नवसाचा २' अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबत कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले
संबंधित बातम्या