जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात. पण तेथील सगळेच प्राणी ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. अशाच एका हटके विषयावर आधारीत 'रानटी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शरद केळकर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
‘रानटी’ या कथेचा नायक थोटा वेगळा आहे. तो काहीचा असाच 'रानटी' बनला आहे. म्हणून चित्रपटाच्या पोस्टरवर "काही ‘रानटी’ असतात, काही बनतात!" असे लिहिण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन कथा ही अतिशय हिंस्त्र आणि त्याहून अधिक अॅक्शनने भरलेली असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे मोठे सरप्राईज असणार आहे.
‘रानटी’ चित्रपटाच्या पोस्टरवरुन त्यामध्ये अभिनेता शरद केळकर हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाल आहे. तो अतिशय वेगळ्या अवतारात दिसत आहे. त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद म्हणाली की, "अधर्मी वृत्तींचा नाश करणार्या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे."
वाचा: इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि चित्रपटाचं नाव यावरून ‘रानटी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार का हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या