Raanti Teaser: जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात. पण तेथील सगळेच प्राणी ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. अशाच एका हटके विषयावर आधारीत 'रानटी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटाचा खतरनाक टीझर प्रदर्शित झाला आहे.
‘रानटी’ टीझरमध्ये आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखवण्यात आला आहे. 'अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट' अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. अॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा कथेतला ड्रामा चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
शरद केळकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रानटी’ सिनेमाचा टीझर शेअऱ केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने ‘लाल लाल रक्त आणि लाख लाख गुन्हे... डेंजर हुं मैं, क्या समझा हैं तुने!?’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर चर्चेत आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य
लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि निर्मितीमूल्यांपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर दिग्दर्शक समित कक्कड यांचे आहे. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता शरद केळकर, संतोष जुवेकर, संजय नार्वेकर आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर रानटी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सर्वजण चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.