हिंदी ओटीटी विश्वातील 'फॅमिली मॅन' ही सीरिज सुपरहिट ठरली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता 'फॅमिली मॅन ३'ची घोषणा करण्यात आली आहे. घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण राज आणि डीके यांच्या या सीरिजमध्ये यावेळी अभिनेता शरद केळकर दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
नुकताच शरद केळकरने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला अरविंद या भूमिकेविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्याने 'मला जेव्हा या सिझनची घोषणा करण्यात आली तेव्हा टॅग करण्यात आले नाही. त्यामुळे कदाचित मी या सिझनचा भाग नसेन. मला या सिझनविषयी कोणतीही माहिती नाही किंवा माहितीही देण्यात आलेली नाही. मी या सिझनची घोषणा केल्याचे मी बातमीमध्ये वाचले पण कोणी मला माहिती दिली नाही. त्यामुळे मला काहीच माहिती नाही. मला वाटते यावेळचा सिझन हा आधीच्या सिझनपेक्षा चांगला असणार आहे' असे उत्तर दिले.
वाचा: अभिनेत्री स्पृहा जोशीच्या आयुष्यात आहेत दोन सुपरहिरो, जाणून घ्या ते कोण?
पुढे शरद केळकर म्हणाला, “त्यांना दुसरा कोणी तरी माणूस सापडला असेल. खरे सांगायचे तर, त्यांनी या सिझनमध्ये काय लिहिले आहे ते मला माहित नाही. माझी त्यांच्याशी कोणतीही बैठक किंवा त्यांच्याशी संवाद झालेला नाही. त्यामुळे माझी भूमिका तिथे आहे की नाही हे मला माहीत नाही. लिहिली असेल तर मी नक्कीच सीरिजमध्ये असेन. नाहीतर, मित्रांनो, मला मिस करा. मी कधीही छेड काढत नाही, मी कधीही खोटे बोलत नाही, म्हणून मी जे बोलत आहे ते खरे आहे.”
वाचा: आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप
द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनमध्ये मनोज, प्रियमणी आणि शारी हाश्मी हे कलाकार श्रीकांत तिवारी, सुचित्रा तिवारी आणि जेके तळपदे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'द फॅमिली मॅन २'च्या पोस्ट-क्रेडिट सीन्समध्ये कोविड-१९ महामारी आणि भारत-चीन सीमा संघर्ष यांच्यातील संबंध असल्याचे संकेत देण्यात आले होते. ईशान्येकडील राज्यांवर हल्ला करण्यासाठी चीनने कोरोना महामारीचा कसा वापर केला, हे तिसऱ्या भागाच्या आधारे दाखवण्यात आले आहे.
वाचा: ठरलं! पहिला मराठी AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
शरद केळकर नुकताच राजकुमार रावच्या 'श्रीकांत' या चित्रपटात दिसला होता. बाहुबली : क्राउन ऑफ ब्लड या अॅनिमेटेड अॅक्शन सीरिजसाठी ही त्याने व्हॉईसओव्हर दिला होता. आता शरदचा पुढचा प्रोजेक्ट काय असणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.