Sharad Kelkar Birthday: अभिनयच नव्हे, डबिंगच्या क्षेत्रातलंही मोठं नाव आहे शरद केळकर! का म्हटलं जातं ‘बाहुबली’? वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sharad Kelkar Birthday: अभिनयच नव्हे, डबिंगच्या क्षेत्रातलंही मोठं नाव आहे शरद केळकर! का म्हटलं जातं ‘बाहुबली’? वाचा

Sharad Kelkar Birthday: अभिनयच नव्हे, डबिंगच्या क्षेत्रातलंही मोठं नाव आहे शरद केळकर! का म्हटलं जातं ‘बाहुबली’? वाचा

Published Oct 07, 2024 09:10 AM IST

Happy Birthday Sharad Kelkar : शरद केळकर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच, एक चांगला व्हॉईस ओव्हर कलाकार देखील आहे. जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल...

Sharad Kelkar Birthday Special
Sharad Kelkar Birthday Special

Sharad Kelkar Birthday Special: अभिनेता शरद केळकर हे सिनेजगतातील एक असे नाव बनले आहे, ज्याने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाची ताकद दाखवली आहे. ७ ऑक्टोबर १९७६ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्मलेल्या शरद केळकर याला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनय असो वा व्हॉईस ओव्हर, शरद केळकरला सगळीकडेच मोठी मागणी आहे. त्याने डबिंगच्या क्षेत्रातही आपले नाव मोठे केले आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल...

शरद केळकर हा मूळचा छत्तीसगडमधील जगदलपूरचा आहे. पण, त्याचे बालपण मध्य प्रदेशात गेले. शरद केळकर अभ्यासात खूप हुशार होता. यामुळेच त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए केले. मात्र, त्यानंतर त्याचा कल अभिनयाकडे वाढू लागला. म्हणून त्याने पूर्णवेळ अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

शरद केळकरची ग्लॅमरच्या दुनियेत एन्ट्री

शरदच्या खाजगी जीवनाबद्दल फार कमी लोकांनाच माहीत असेल. पण, शरद केळकर याने ग्वाल्हेरमध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. काही काळानंतर, जेव्हा तो आपल्या चुलत भावाला भेटायला मुंबईत आला तेव्हा त्याच्या चांगल्या दिसण्यामुळे त्याला रॅम्पवर जलवा दाखवण्याची ऑफर मिळाली. यानंतर शरदने ग्लॅमरच्या दुनियेत आपला प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

Sharad Kelkar Birthday: बालपणी ज्या आजारामुळे होता त्रस्त त्यावरच मात करून शरद केळकर झाला प्रसिद्ध!

'आक्रोश'मधून शरदची मनोरंजन विश्वात एन्ट्री!

शरद केळकर याने आपल्या अभिनय कारकिर्दीला दूरदर्शनच्या 'आक्रोश' या मालिकेतून सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या यादीत ‘सीआयडी’, ‘उतरन’ आणि ‘रात होने को है’ इत्यादी मालिकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ‘रॉक-एन-रोल’, ‘सारेगामापा चॅलेंज’, ‘पती-पत्नी और वो’सारखे शो होस्ट केले होते. त्याचवेळी त्याने ‘नच बलिए २’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. 

असा झाला मोठ्या पडद्यावरचा 'बाहुबली'! 

शरद केळकर याने मोठ्या पडद्यावरही आपली ताकद दाखवून दिली आहे. २००४मध्ये ‘हलचल’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो ‘अ पेइंग घोस्ट’, ‘मोहेंजो दारो’, ‘रॉकी हँडसम’, ‘सरदार गब्बर सिंग’, ‘गेस्ट इन लंडन’, ‘राक्षस’, ‘भूमी’, ‘तानाजी’ आणि ‘बादशाहो’ आदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. शरद केळकर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच, एक चांगला व्हॉईस ओव्हर कलाकार देखील आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या हिंदी आवृत्तीत त्याने प्रभासला आवाज दिला होता. त्याचबरोबर त्याने प्रभासला ‘आदिपुरुष’ या चित्रपटातही आवाज दिला होता.

Whats_app_banner