मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Grammy Awards 2024: 'ग्रॅमी'वर उमटली भारतीय संगीताची मोहोर! 'This Moment' ने मारली बाजी

Grammy Awards 2024: 'ग्रॅमी'वर उमटली भारतीय संगीताची मोहोर! 'This Moment' ने मारली बाजी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 09:43 AM IST

Shakti Band Won Grammy Award: प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवनच्या शक्ती बँडने यंदा ग्रॅमी पुरस्कारामध्ये बाजी मारली आहे.

Band Shakti poses in the press room with the Grammy for Global Music Album for "This Moment" during the 66th Annual Grammy Awards at the Crypto.com Arena in Los Angeles on February 4, 2024. (Photo by Frederic J. Brown / AFP)
Band Shakti poses in the press room with the Grammy for Global Music Album for "This Moment" during the 66th Annual Grammy Awards at the Crypto.com Arena in Los Angeles on February 4, 2024. (Photo by Frederic J. Brown / AFP) (AFP)

Grammy Awards 2024: जगभरतील संगीत प्रेमी ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात तो सोहळा म्हणजे 'ग्रॅमी पुरस्कार.' ४ फेब्रुवारी रोजी ग्रॅमी पुरस्कार २०२४ मोठ्या थाटामाटात पार पडला. कोणत्या गायकांना हा पुरस्कार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यंदा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी बाजी मारली आहे. प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवनच्या शक्ती बँडच्या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोण आहे शक्ती बँडमध्ये?

शक्ती बँडने 'धिस मूव्हमेंट' हे गाणे कंपोझ केले होते. या गाण्यात गिटारिस्ट जॉन मॅकलॉग्लिन, उस्ताद झाकीर हुसैन (Ustad Zakir Hussain), गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan), तालवादक व्ही सेल्वागणेश आणि व्हायोलिनिस्ट गणेश राजगोपालन यांनी संगीतबंध केले आहे. या गाण्याला यावेळी ग्रॅमीनं सन्मानित करण्यात आले आहे.
वाचा: ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सिनेमा घर बसल्या पाहायचा आहे? मग ही बातमी नक्की वाचा

बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटगिरीमध्ये मिळाला पुरस्कार

ग्रॅमीवर पुन्हा एकदा भारतीय संगीतकार, वादक आणि गायक यांची मोहोर उमटल्याने तमाम भारतीय संगीतप्रेमी, श्रोत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्रॅमी जिंकल्यानंतर सोशल मीडियावरुन विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शक्ती बँडला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटगिरीमधून पुरस्कार मिळाला आहे. या बँडचे 'धिस मूव्हमेंट' हे गाणे सध्या चर्चेत असून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.

This Moment अल्बलमध्ये आहे तरी काय?

'धिस मूव्हमेंट' या अल्बमध्ये प्रेमाची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली आहे. प्रेमाच्या शक्तीला संगीत हे नेहमी प्रेरणास्त्रोत ठरत असते. ते कशाप्रकारे प्रेमाला प्रेरित करते हे या अल्बमच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. १९७३ साली ज्या संघर्षाला सुरुवात झाली होती त्याचा प्रवास या अल्बममध्ये अधोरेखीत केला आहे. संगीत क्षेत्रातील वाटचाल आणि संघर्ष विशेष दाखवण्यात आला आहे.

‘ग्रॅमी’ पुरस्कारांचे यंदाचे हे ६६वे वर्ष

ग्रमी पुरस्कार २०२४ हा सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला जगभरातील मान्यवर संगीतकार, गायक, वादक उपस्थित होते. यावेळी ज्यांना यंदाच्या ग्रॅमीमध्ये नामांकन होते त्यांचे सादरीकरणही झाले. त्याला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. गायिका मायली सायरलसा तिच्या करिअरमधील पहिला ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाला आहे. ‘ग्रॅमी २०२४’ पुरस्कारत एसजेडएचा दबदबा पाहायला मिळाला. तिला ९ कॅटेगिरीमध्ये नॉमिनेशन देण्यात आले होते. प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेवर नोआने यंदा देखील ग्रॅमी पुरस्काराचे सूत्रसंचान केले. लागोपाठ चार वर्षे तो या पुरस्काराचे सूत्रसंचालन करत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग