मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुख खानची लाडकी लेक झाली २४ वर्षांची! 'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या खास शुभेच्छा!

शाहरुख खानची लाडकी लेक झाली २४ वर्षांची! 'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या खास शुभेच्छा!

May 22, 2024 08:03 AM IST

अभिनेता आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आज (२२ मे ) वाढदिवस आहे. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना आज २४ वर्षांची झाली आहे.

'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!
'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

अभिनेता आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आज (२२ मे ) वाढदिवस आहे. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना आज २४ वर्षांची झाली आहे. या खास निमित्ताने सुहानाच्या ‘बेस्ट फ्रेंड’ असणाऱ्या अनन्या पांडे, शनाया कपूर आणि नव्या नवेली नंदा यांनी सोशल मीडियावर सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

सुहाना खानची बालपणीची मैत्रीण आणि सहकारी अभिनेत्री अनन्या पांडे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर सुहानासह इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सची जर्सी परिधान केली आहे. शाहरुखच्या मालकीच्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी या दोन्ही कलाकार यंदाच्या सीझनमध्ये कोलकाताच्या इडन गार्डन्स आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील केकेआरच्या सामन्यांना वारंवार हजेरी लावताना दिसल्या. अनन्याने सुहाना सोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या बेस्ट गर्लला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! संपूर्ण जगात तुझ्यासारखं कोणीच नाही. आय लव्ह यू सुझी (रेड हार्ट इमोजी). @suhanakhan2 हा फोटो आम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट करतानाचा सर्वात आनंदी फोटो आहे.’

अनन्या पांडेने दिल्या शुभेच्छा!
अनन्या पांडेने दिल्या शुभेच्छा!

शनाया कपूरनेही दिल्या शुभेच्छा!

अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरनेही असाच एक फोटो शेअर करत सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत. केकेआरची जर्सी परिधान करून व्हीआयपी स्टँडवरून टीमला चिअर करताना शनाया सुहानाकडे पाहून हसताना दिसत आहे. शनायाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटोसह लिहिले की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्यावर खूप प्रेम आहे.’

शनाया कपूरने दिल्या शुभेच्छा!
शनाया कपूरने दिल्या शुभेच्छा!

सायली अर्जुनचं घर सोडून निघून जाणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार धक्कादायक वळण

महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिनेही सुहानाला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोल्का डॉट ड्रेसमधील सुहानाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘हॅप्पी बर्थडे सुहाना’ सोबत रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. नव्याचा भाऊ अगस्त्य नंदा 'द आर्चीज' या चित्रपटातील त्याची सहकलाकार सुहाना खान हिला डेट करत असल्याची चर्चा आहे.

नव्या नवेली नंदाने दिल्या शुभेच्छा!
नव्या नवेली नंदाने दिल्या शुभेच्छा!

सुहाना खानबद्दल खास गोष्टी!

शाहरुख खान याची लाडकी लेक सुहाना खानचा जन्म २२ मे २००० रोजी झाली. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सेलिब्रिटी इंटिरिअर डिझायनर गौरी खान यांची ही मुलगी आहे. ती एक प्रशिक्षित अभिनेत्री आहे आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आर्ची कॉमिक्सचे रूपांतर असलेल्या झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नेटफ्लिक्स इंडियावर प्रसारित झालेल्या ‘द आर्चीज’मध्ये सुहानाने व्हेरोनिका लॉजची भूमिका साकारली होती. 'किंग' या आगामी चित्रपटात ती शाहरुखसोबत झळकणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४