मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shalva Kinjawadekar: ‘येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओम येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ मालिकेत

Shalva Kinjawadekar: ‘येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओम येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ मालिकेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2024 10:32 AM IST

Shalva Kinjawadekar Serial: येत्या १२ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता शाल्वला मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Shalva Kinjawadekar
Shalva Kinjawadekar

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला.' या मालिकेतील स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र ओम ही भूमिका साकारणार शाल्व किंजवडेकर भलताच लोकप्रिय ठरला होता. मालिका संपल्यावर ओमने काही दिवस ब्रेक घेतल्यावर आता पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

शाल्व किंजवडेकर लवकरच झी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेतून पुनरागमन करत आहे. शिवाचा नवीन प्रोमो पाहून तुम्हाला शाल्वच्या लुकची कल्पना आलीच असेल आईचा लाडका आशु कुटुंबाची शान आहे. आशुच्या जीवनात, शिवाची एन्ट्री काय धुमाकूळ घालते हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. येत्या १२ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता शाल्वला मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: '12वी फेल'ने मारली बाजी! या अभिनेत्रीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

शाल्व विषयी बोलायचे झाले तर त्याने येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत काम केले. त्यानंतर आता तो ‘शेतकरी नवरा हवा’ मालिकेत दिसला. खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

ट्रेंडिंग न्यूज

काही महिन्यांपूर्वी ‘शेतकरी नवरा हवा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या मालिकेचे नाव आणि कथानक चोरल्याचा आरोप केला होता. सांगलीच्या आटपाडीतील लेखिका मेधा पाटील यांनी याबद्दलचा आरोप केला होता. मेधा पाटील यांनी मालिकेच्या निर्मात्यांविरोधात आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता शाल्व ‘शिवा’ मालिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

WhatsApp channel
विभाग