मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Grammys 2024: शंकर महादेवन आणि तबला वादक झाकिर हुसैनने जिंकला ग्रॅमी पुरस्कार

Grammys 2024: शंकर महादेवन आणि तबला वादक झाकिर हुसैनने जिंकला ग्रॅमी पुरस्कार

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 09:47 AM IST

Grammys Winner list 2024: यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार २०२४ कोणत्या कलाकारांनी पटकावला वाचा संपूर्ण यादी

Shankar Mahadevan of Shakti poses in the press room with the award for best global music album for "This Moment" during the 66th annual Grammy Awards on Sunday, Feb. 4, 2024, in Los Angeles. AP/PTI(AP02_05_2024_000011A)
Shankar Mahadevan of Shakti poses in the press room with the award for best global music album for "This Moment" during the 66th annual Grammy Awards on Sunday, Feb. 4, 2024, in Los Angeles. AP/PTI(AP02_05_2024_000011A) (AP)

Grammys Winner list 2024: मनोरंजन आणि संगीत विश्वातील प्रतिष्ठीत पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘ग्रॅमी २०२४’ पुरस्काराची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांनमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. रविवारी ४ फेब्रुवारी रोजी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्याप्रमाणे ‘ऑस्कर’ पुरस्कार हा अभिनय आणि चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, त्याचप्रमाणे ‘ग्रॅमी’ पुरस्कार हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचे काम यामुळे वाखाणले जाते. जगभरातील रचल्या गेलेल्या संगीतांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. हे पुरस्कार विविध श्रेणींमध्ये वितरित केले जातात. ‘ग्रॅमी’ पुरस्कारांचे यंदाचे हे ६६वे वर्ष आहे. यंदा कोणाकोणाला हा पुरस्कार मिळाला चला जाणून घेऊया...

भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबला वादक झाकिर हुसैन यांना यंदाचा ‘ग्रॅमी २०२४’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच गायिका मायली सायरलसा तिच्या करिअरमधील पहिला ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाला आहे. ‘ग्रॅमी २०२४’ पुरस्कारत एसजेडएचा दबदबा पाहायला मिळाला. तिला ९ कॅटेगिरीमध्ये नॉमिनेशन देण्यात आले होते. प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेवर नोआने यंदा देखील ग्रॅमी पुरस्काराचे सूत्रसंचान केले. लागोपाठ चार वर्षे तो या पुरस्काराचे सूत्रसंचालन करत आहे.
वाचा: प्रसन्नला श्रीदेवी पावणार का? वाचा कसा आहे सिद्धार्थ-सईचा नवाकोरा चित्रपट?

‘ग्रॅमी पुरस्कार २०२४’ विजेत

बेस्ट पॉप सोलो परफॉर्मेंस : मायली सायरस (फ्लावर)

बेस्ट अल्बम : एसजेडए (SOS)

बेस्ट परफॉर्मेंस : कोको जोन्स (आयसीयू)

रॅप अल्बम : किलर माइक (मायकल)

बेस्ट अफ्रीकी म्यूझिक परफॉर्मेंस : टायला (वाटर)

ग्रुप परफॉर्मेंस : एसजेडए, फोबे ब्रिजर्स (घोस्ट इन द मशीन)

म्यूझिक व्हीडिओ : द बीटल्स, जोनाथन क्लाइड, एम कूपर (आई एम ओनली स्लीपिंग)

ग्लोबल म्यूझिक परफॉर्मेंस : जाकिर हुसैन, बेला फेक, एडगर मेयर (पश्तो)

अल्टरनेटिव म्यूझिक अल्बम : बॉयजीनियस (द रिकॉर्ड)

ग्लोबल म्यूझिक अल्बम : शक्ति (द मोमेंट)

प्रोड्यूसर ऑफ द इयर, नॉन-क्लासिकल : जॅक एंटोनॉफ

प्रोड्यूसर ऑफ द इयर, क्लासिकल : ऐलेन मार्टोन

बेस्ट इंजीनियर्ड अल्बम, क्लासिकल : रिकार्डो मुटी आणि सिम्फनी ऑर्केस्ट्रा

बेस्ट ब्लूग्रास अल्बम : मॉली टर्टल आणि गोल्डन हायवे (सिटी ऑफ गोल्ड)

बेस्ट कंटेम्परेरी इन्स्ट्रमेंटल अल्बम : बेला फेक, जाकिर हुसैन, एडगर मेयर, राकेश चौरसिया (एज वी स्पीक)

बेस्ट जॅज परफॉर्मेंस अल्बम : बिली चिल्ड्स (द विंड ऑफ चेन्ज)

बेस्ट जॅज परफॉर्मेंस : समारा जॉय (टाइट)

बेस्ट प्रगतशील आर एंड बी एल्बम : एसजेडए (एसओएस)

ग्रमी पुरस्कार २०२४ सुरु असताना पॉप सेंसेशन टेलर स्विफ्टची अधिकृत वेबसाइट डाउन झाली होती. कारण ती या पुरस्कार सोहळ्यात तिच्या आगामी अल्बमची घोषणा करणार होती. तिच्या नव्या अल्बम विषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.

WhatsApp channel