९०च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे 'शक्तिमान.' या मालिकेने थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते. या मालिकेत अभिनेते मुकेश खन्ना हे शक्तिमानच्या भूमिकेत होते. आता मुकेश खन्ना हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखले जातात. अनेकदा त्यांना या सर्वामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मुकेश हे ६६ वर्षांचे झाले असून त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. पण त्यांनी लग्न का केले नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता स्वत: मुकेश यांनी यावर वक्तव्य केले आहे.
मुकेश खन्ना यांनी खासगी आयुष्यावर फार कमी वेळा वक्तव्य केले आहे. अशातच त्यांनी थेट लग्न न करण्यामागचे कारण सांगितले आहे. 'लग्न हे संविधान आहे, पवित्र बंधन आहे. मला वाटतं लग्नात दोन आत्मे एक होतात. पण हल्ली आपण लग्नाला दोन बाहुल्यांच्या खेळासारखा मानतो. देवाच्या या स्वप्नात आपण सर्व आत्मा ही भूमिका बजावत असतो. जेव्हा तुम्ही या जगात आलात, तेव्हा तुम्ही आत्मा म्हणून आलात. अंबानींसारख्या कुटुंबात जन्माला आल्याचा अर्थ असा नाही की कर्माच्या पलीकडे आपल्या भावंडांशी तुमचे खोल नाते आहे' असे मुकेश खन्ना म्हणाले.
पुढे ते म्हणाले, 'आजच्या काळात मुलगा किंवा मुलगी आपल्या पारंपरिक अपेक्षांचे पालन करते. वैवाहिक जीवनात दोन्ही आत्मे एकच आहेत, पण दोघांचाही स्वतःचा स्वभाव आणि कर्म वेगवेगळे आहे. अलेक्झांडर, शक्तीमान किंवा अगदी रावणासारखे आपण स्वत:ला खूप महान समजतो. पण सत्य हे आहे की आपण काहीच नाही. आपण फक्त एक साधा आत्मा आहोत. मी लग्न न करण्याचे कारण मला ते आवडत नाही म्हणून मी अजूनही लग्न करत नाही. पण कदाचित हे माझं नशीब आहे. मी भीष्मव्रत घेतले आहे असे अजिबात नाही.'
वाचा: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
मुकेश यांना या मुलाखतीमध्ये भविष्यात लग्न करायचे आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुकेश यांनी, 'नो कॉमेंट' असे उत्तर देत टाळाटाळ केली. मुकेश यांची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
संबंधित बातम्या