Shakti Kapoor: दारुचे व्यसन ते पूनम पांडेसोबत रोमॅन्स, वाचा शक्ती कपूर यांच्याविषयी खास गोष्टी-shakti kapoor birthday special know about him ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shakti Kapoor: दारुचे व्यसन ते पूनम पांडेसोबत रोमॅन्स, वाचा शक्ती कपूर यांच्याविषयी खास गोष्टी

Shakti Kapoor: दारुचे व्यसन ते पूनम पांडेसोबत रोमॅन्स, वाचा शक्ती कपूर यांच्याविषयी खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 03, 2024 07:31 AM IST

Shakti Kapoor Birthday: अभिनेते शक्ती कपूर यांना एकेकाळी दारुचे व्यसन लागले होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने ते व्यसन घालवण्यासाठी मदत केली.

Shakti Kapoor
Shakti Kapoor

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेता म्हणून नेहमीच शक्ती कपूर यांचे नाव घेतले जाते. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शक्ती कपूर यांनी इंडस्ट्रीमध्ये करिअर करत असताना अनेक चढउतारांचा सामना केला. त्यांनी जवळपास ७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी एक रिअॅलिटी शो देखील केला. पण शक्ती कपूर यांना दारुचे व्यसन लागले होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तीन यातून बाहेर पडण्यास त्यांची मदत केली.

दारुचे व्यसन

शक्ती कपूर यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. त्यांचे खरे नाव सिकंदरलाल कपूर असे आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी नाव बदलले होते. जवळपास तीन दशके शक्ती कपूर यांनी काम केले आहे. त्यांनी ७०० हून अधिक चित्रपटात काम केले. ८० ते ९०च्या दशकात त्यांनी असरानी आणि कादर खान यांच्यासोबत १०० चित्रपट केले आहेत. शक्ती कपूर यांना दारुचे व्यसन लागले होते. पण मुलगी, अभिनेत्री श्रद्धा कपूरने त्यांचे हे व्यसन सोडवण्यास मदत केली.

बिग बॉसच्या घरात एण्ट्री

शक्ती कपूर यांनी मल्याळम, बंगाली, उड़िया, पंजाबी, तेलुगू, इंग्लिश, नेपाली, मराठी, असमी, कन्नड़, बांग्लादेशी अशा अनेक भाषांमध्ये काम केले आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी चिरंजीवीसोबत काम केले. शक्ती कपूर हे बिग बॉस सिझन ५ च्या घरात देखील दिसले होते. पण ते हा शो जिंकू शकले नाहीत. बिग बॉसच्या घरातील त्यांचे वागणे सतत प्रेक्षकांना खटकू लागले होते. 'बिग बॉस'चा पाचवा सिझन २०१२मध्ये पार पडला होता. त्यावेळी जुही परमार हा शो जिंकली होती.
वाचा: 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते', प्रसिद्ध रॅपरचा धक्कादायक खुलासा

३९ वर्षांनी लहान पूनम पांडेसोबत रोमॅन्स

शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देखील दिले. अनेक अभिनेत्रींसोबत रोमँन्स केला. पण बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेसोबत दिलेले बोल्ड सीन्स विशेष चर्चेत होते. जर्नी ऑफ कर्मा या चित्रपटात पूनम पांडे आणि शक्ती कपूर हे एकत्र दिसले होते. त्यांनी या चित्रपटात बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यावेळी शक्ती कपूर यांनी ३९ वर्षांनी लहान असणाऱ्या पूनमसोबत बोल्ड सीन्स दिल्यामुळे चर्चा रंगल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. मात्र, या चित्रपटातील सीन्स विशेष गाजले होते.

विभाग