जगभरात सध्या लाइव्ह कॉन्सर्टची क्रेझ पाहायला मिळते. आपल्या आवडत्या गायकाला लाइव्ह परफॉर्म करताना पाहण्याची अनेक चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे एखाद्या गायकाच्या लाइव्ह कॉन्सर्टला
तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पण कधीकधी काही चाहते परफॉर्म करणाऱ्या गायकांसोबत विचित्र वागताना दिसतात. असेच काहीसे हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका शकीरासोबत देखील झाले आहे. सध्या सोशल मीडियावर शकीराचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पॉप स्टार शकीराने नुकताच 'सॉल्टेरा' हे तिचे गाणे गायले. हा कॉन्सर्ट वाक्या, लिव मियामी या क्लबमध्ये ठेवण्यात आला आहे. शकीरा परफॉर्म करत असताना प्रेक्षकांच्या गर्दीत उभ्या असलेल्या एका चाहत्याने व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. चाहता काहीतरी विचित्र व्हिडीओ करत असल्याचे पाहून शकीरा चिडली. तिने सुर असलेला कार्यक्रम सोडून दिला. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
सुरुवातीला शकीरा माईक घेऊन स्टेजवर गाणे गाताना दिसत आहे. तिच्या आसपास चाहत्यांची गर्दी देखील दिसत आहे. हे चाहते शकीराच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. काहीच वेळात शकीराची नजर समोर उभ्या असलेल्या गर्दीतील एका चाहत्यावर पडते. ते पाहून शकीरा तिचा स्कर्ट नीट करताना दिसत आहे. त्यानंतर ती हाताने काही तरी इशारा करते. त्यानंतर काही सेकंद ती स्टेजवर परफॉर्म करते. तरीही चाहता व्हिडीओ रेकॉर्ड करणे थांबवत नसल्याचे पाहून शकीरा स्टेजच्या दुसऱ्या बाजूला जाते. स्टेजच्या दुसऱ्या बाजूला व्हिआयपी चाहते आणि सिक्युरिटी गार्ड्स उभे असतात.
चाहत्याने असे कृत्य करताच शकीराचे वागणे बदलते. ती कार्यक्रम सोडून निघून जाते. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. एका यूजरने शकीराला पाठिंबा देत व्हिडीओ शूट करणाऱ्याला चांगलेच सुनावले आहे. दुसऱ्या एका यूजरने 'अशा लोकांना कॉन्सर्टमध्ये घेतलेच नाही पाहिजे' असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
असे पहिल्यांदाच झालेले नाही की लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याने चुकीचे वर्तन केले आहे. यापूर्वी एका पंजाबी गायकावर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याने बूट फेकून मारला होता. गायकाने कॉन्सर्टमध्ये थांबून बूट फेकून मारणाऱ्या चाहत्याला चांगलेच ऐकवले होते. त्या गायकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता त्या पाठोपाठ शकीराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.