‘शाका लाका बूम बूम’मधील संजू अडकणार विवाहबंधनात, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘शाका लाका बूम बूम’मधील संजू अडकणार विवाहबंधनात, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात

‘शाका लाका बूम बूम’मधील संजू अडकणार विवाहबंधनात, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 23, 2024 09:24 AM IST

‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेतील संजू उर्फ किंशुक वैद्य आता लग्न बंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

shaka laka boom boom
shaka laka boom boom

छोट्या पडद्यावरील लहान मुलांची आवडती मालिका म्हणून ‘शाका लाका बूम बूम’ पाहिली जायची. शाळेतून आल्यावर दप्तर टाकून लहान मुले सर्वात आधी टीव्ही सुरु करायची आणि ही मालिका पाहायची. या मालिकेतील संजूकडे एक जादूची पेन्सिल होती. या मालिकेने जवळपास सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेत मुख्य भूमिका सकारणारा संजू म्हणजेच किंशुक वैद्य हा चांगलाच चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनंतर तो चर्चेत आला आहे. कारण किंशुक हा विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

अलिबागमध्ये करणार लग्न

किंशुक हा गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. त्याचा विवाहसोहळा आज अलिबाग येथे पार पडणार आहे. किंशुकच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ‘इटाइम्सच्या रिपोर्ट’नुसार, किंशुक व दीक्षा नांगपाल यांचे लग्न अलिबागमध्ये होणार आहे. त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याचे हळद व संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. दीक्षानेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हळदी समारंभाचा फोटो शेअर केला आहे.

साखरपुड्याचा फोटो झाला होता व्हायरल

३३ वर्षांच्या किंशुकने ऑगस्टमध्ये साखरपुड्याच्या वृत्ताने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. किंशुकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटों शेअर केला होता. यामध्ये तो व त्याची होणारी बायकोदेखील दिसली होती. यामध्ये दोघांच्याही साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहेत. किंशुकने निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला असून त्याच्या होणाऱ्या बायकोने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
वाचा : कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...

कोण आहे किंशुकची होणारी पत्नी?

किंशुक हा दीक्षा नागपालसोबत लग्न करणार आहे. दीक्षा ही एक नृत्यदिग्दर्शिका आहे. तिने ‘पंचायत २’ मधील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले. तसेच किंशुकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने ‘वो तो है अलबेला’ या कार्यक्रमात दिसला होता. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. यासोबतच त्याने ‘ वो अपना सा ’, ‘एक रिश्ता साझेदारी का’ , जात ना पुछो प्रेम की ’ व ‘ कर्ण संगिनी ’ या मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याची लहानपणीची ‘शाका लाका बूम बूम’ ही मालिका विशेष गाजली होती.

Whats_app_banner