मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shaitaan Movie Twitter Review: ‘शैतान’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावरही कल्ला! चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणतायत...

Shaitaan Movie Twitter Review: ‘शैतान’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावरही कल्ला! चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणतायत...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 08, 2024 01:48 PM IST

Shaitaan Movie Twitter Review:‘शैतान’ आता सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घालू लागला आहे. चला तर पाहूया नेटकऱ्यांना कसा वाटलाय हा चित्रपट...

Shaitaan Movie Twitter Review
Shaitaan Movie Twitter Review

Shaitaan Movie Twitter Review: बॉलिवूड अभिनेताअजय देवगण आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका असलेला'शैतान' हाचित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ दिसून येत होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला असून, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया आणि रिव्ह्यूजचा पाऊस पडत आहे. ‘शैतान’ आता सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घालू लागला आहे. चला तर पाहूया नेटकऱ्यांना कसा वाटलाय हा चित्रपट...

नेटकऱ्यांनी केलं ‘शैतान’चं कौतुक!

सोशल मीडियावर'शैतान'बद्दल रिव्ह्यूंचा पाऊस पडत आहे. अजय देवगणचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाविषयी लिहिताना एका युजरने लिहिले की, ‘अजय देवगणचा ‘शैतान’ हा भीतीचा नवा चेहरा आहे.’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘हा चित्रपट खरंच अंगावर शहारे आणणारा आहे.’ तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘शैतान चित्रपटाचा पूर्वार्ध अतिशय अद्भुत आहे. या चित्रपटाने जागीच खिळवून ठेवलं आहे.’ एकंदरीतच चाहते सोशल मीडियावर या चित्रपटाला शानदार म्हणत आहेत.

Dolly Sohi Passes Away: सर्व्हायकल कॅन्सरशी लढणाऱ्या अभिनेत्रीचं निधन; बहिणीचाही काही तास आधीच झाला मृत्यू

‘शैतान’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच लोकांना या चित्रपटातील थराराची कल्पना आली होती. आता हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाल्याने लोकांमध्ये त्याची क्रेझ आणखीनच वाढली आहे. चित्रपटासाठी लोकांची उत्कंठा पाहता, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनकडेही सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. पहिल्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करतो. याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

धमाकेदार ओपनिंग मिळणार!

अजय देवगण आणि आर माधवन यांचा'शैतान' हा चित्रपट दमदार कलेक्शन करू शकतो, असे म्हटले जात आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहिल्यानंतर, अजय देवगणचा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करू शकतो, अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'शैतान'चे ओपनिंग डे कलेक्शन १० ते १२ कोटींच्या दरम्यान होऊ शकते. विशेष म्हणजे‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाला चांगला ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel