मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Box Office Prediction: अजय देवगण-आर माधवनचा ‘शैतान’ बॉक्स ऑफिस गाजवणार? मिळू शकते दमदार ओपनिंग

Box Office Prediction: अजय देवगण-आर माधवनचा ‘शैतान’ बॉक्स ऑफिस गाजवणार? मिळू शकते दमदार ओपनिंग

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 08, 2024 08:47 AM IST

Shaitaan Box Office Prediction: अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट दमदार ओपनिंग करू शकतो, असे म्हटले जात आहे.

Shaitaan Box Office Prediction
Shaitaan Box Office Prediction

Shaitaan Box Office Prediction: बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणजेच अजय देवगणसाठी २०२४ हे वर्ष खूप खास असणार आहे. नुकताच अजय देवगण याच्या आगामी 'मैदान' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, तर दुसरीकडे त्याचा 'शैतान' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही तास उरले आहेत. अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट आज म्हणजेच ८ मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. पण, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, आता चाहत्यांच्या नजरा त्याच्या 'शैतान' या चित्रपटावर खिळल्या आहेत. ओपनिंगच्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करू शकतो, याबद्दल आता अंदाज बांधला जात आहे.

अजय देवगण आणि आर माधवन यांच्या 'शैतान' या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग ३ मार्चपासून सुरू झाले आहे. गेल्या चार दिवसांतील ॲडव्हान्स बुकिंग रिपोर्ट्सनुसार 'शैतान'ने आतापर्यंत तब्बल ८९ हजार तिकिटांची विक्री केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'शैतान'ने गुरुवारी सकाळपर्यंत ९८,९८३ तिकिटांची विक्री केली होती. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने २.२९ कोटींची कमाई केली आहे. मात्र, शुक्रवारी हा आकडा आणखी वाढू शकतो.

Dolly Sohi Passes Away: सर्व्हायकल कॅन्सरशी लढणाऱ्या अभिनेत्रीचं निधन; बहिणीचाही काही तास आधीच झाला मृत्यू

बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग

अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट दमदार कलेक्शन करू शकतो, असे म्हटले जात आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहिल्यानंतर, अजय देवगणचा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करू शकतो, अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'शैतान'चे ओपनिंग डे कलेक्शन १० ते १२ कोटींच्या दरम्यान होऊ शकते. विशेष म्हणजे ‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाला चांगला ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.

गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक

अजय देवगण आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका असलेला 'शैतान' हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपट 'वश'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात जानकी बोडीवाला दिसली होती. जानकी बोडीवाला 'शैतान'मध्ये अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण आणि आर माधवन यांच्यासोबतच या चित्रपटात ज्योतिकाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर आपली दहशत निर्माण करण्यात 'शैतान' कितपत यशस्वी होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

WhatsApp channel