Shaitaan Box Office Collection: रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांत ‘शैतान’नं केलं बजेट वसूल! किती झाली कमाई?-shaitaan box office collection day 5 ajay devgn and r madhavan starrer movie earns making budget ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shaitaan Box Office Collection: रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांत ‘शैतान’नं केलं बजेट वसूल! किती झाली कमाई?

Shaitaan Box Office Collection: रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांत ‘शैतान’नं केलं बजेट वसूल! किती झाली कमाई?

Mar 13, 2024 07:46 AM IST

Shaitaan Box Office Collection Day 5: चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 'शैतान'ने आपल्या जादूने बॉक्स ऑफिसवरही कब्जा केला आहे. ‘शैतान’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही चित्रपटगृहात येत आहेत.

Shaitaan Box Office Collection Day 5
Shaitaan Box Office Collection Day 5 (Girish Srivastav)

Shaitaan Box Office Collection Day 5: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. काळी जादू आणि वशिकरण अशा गोष्टींवर आधारित हा हॉरर थ्रिलर चित्रपट रिलीज झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये कल्ला करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले होते. त्यानंतर वीकेंडला देखील 'शैतान' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी झाली होती. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाने भरपूर नफा कमावला. मात्र, आठवड्याच्या दिवशी 'शैतान'च्या कमाईत काहीशी घट झालेली दिसली. तरी, या चित्रपटाने रिलीजच्या ५व्या दिवशीच मेकिंग बजेट वसूल केले आहे.

गुजराती चित्रपट 'वश'चा हिंदी रिमेक असलेल्या 'शैतान'चा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यापासूनच चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 'शैतान'ने आपल्या जादूने बॉक्स ऑफिसवरही कब्जा केला आहे. ‘शैतान’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही चित्रपटगृहात येत आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १४.७५ कोटींची कमाई करून दमदार ओपनिंग केली होती. तर, दुसऱ्या दिवशी २७.१२ टक्क्यांच्या वाढीसह चित्रपटाने १८.७५ कोटींची कमाई केली.

Nitish Bharadwaj Daughters :'तुला बाबा म्हणायचीही लाज वाटते'; मुलींच्या बोलण्याने टीव्हीच्या ‘श्रीकृष्णा’ला बसला धक्का!

पाच दिवसांत ‘इतकी’ कमाई!

तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 'शैतान'ने २०.५ कोटी कमावले. यासह 'शैतान'ने रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार करत अर्धशतक पूर्ण केले आहे. वीकेंडला तुफानी कलेक्शन केल्यानंतर 'शैतान'ची कमाई आठवड्याच्या दिवशी निम्म्याहून कमी झाली आहे. या चित्रपटाने पहिल्या सोमवारी ७.२५ कोटींचा व्यवसाय केला. आता 'शैतान'च्या रिलीजच्या पाचव्या दिवसाच्या म्हणजेच पहिल्या मंगळवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'शैतान' ने रिलीजच्या पहिल्या मंगळवारी ६.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे 'शैतान'चे ५ दिवसांचे एकूण कलेक्शन आता ६७.७५ कोटी रुपये झाले आहे.

'शैतान'ने त्याचे बजेट केले वसूल!

आठवड्याच्या पहिल्या दिवसांत 'शैतान'च्या कमाईत घट झाली आहे, पण रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत 'शैतान'ने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘शैतान’ हा चित्रपट ६० ते ६५ कोटींच्या बजेटमध्ये बनला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, चित्रपटाने ६७ कोटींहून अधिक कमाई करून चित्रपटाचे मेकिंग बजेट वसूल केले आहे. आता या चित्रपटाने नफा कमावण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता, 'शैतान' हा २०२४ सालचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार आहे.

Whats_app_banner