बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नेहमीच त्याच्या खास स्टाईलसाठी ओळखला जातो. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला किंग खानने खास हजेरी लावली होती. अनंत-राधिकाच्या लग्नातील शाहरुखचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. त्यामधील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चाहते हा व्हिडीओ पाहून शाहरुख खानचे कौतुक करत आहेत. काय झालं नेमकं चला पाहूया...
अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात संपूर्ण बॉलीवूड नाचताना दिसले. अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह या लग्नाला उपस्थित होते. शाहरुख खानसोबत त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना देखील होती. अशातच शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांच्या पत्नीला हात जोडून अभिवादन करताना दिसत आहे. यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन त्यांच्यासमोर येताच त्यांनी नतमस्तक होऊन दोघांच्याही पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला आहे.
शाहरुख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. किंग खानच्या या नम्र स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाहरुखच्या देशात आणि जगात दूरवर बसलेल्या चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने 'आपण उगाच शाहरुखला किंग खान म्हणत नाही' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'शाहरुख नेहमीच सर्वांची मने जिंकत असतो' अशी कमेंट केली आहे.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ
शाहरुख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. किंग खानच्या या नम्र स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाहरुखच्या देशात आणि जगात दूरवर बसलेल्या चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने 'आपण उगाच शाहरुखला किंग खान म्हणत नाही' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'शाहरुख नेहमीच सर्वांची मने जिंकत असतो' अशी कमेंट केली आहे.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ|#+|
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला क्रीडा, बॉलिवूड, राजकारण, व्यवसाय आणि जवळपास प्रत्येक क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, रजनीकांत, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, आलिया भट्ट, शाहिद कपूर, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, निक जोनस, राम चरण, महेश बाबू आणि रणबीर कपूर यांनी लग्नाला हजेरी लावली. सर्वांनी या क्षणाचा आनंद लुटत जोरदार डान्स केला.
संबंधित बातम्या