मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा

'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 18, 2024 04:18 PM IST

अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अबरामला लहानपणी महाभारतामधील कथा सांगितल्याचे म्हटले होते.

shahrukh khan abram
shahrukh khan abram

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चर्चेत असतो. शाहरुखसोबतच त्याचे कुटुंबीय देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. शाहरुखचा धाकटा लेक अबराम हा अनेकदा त्याच्यासोबत फिरताना दिसतो. एकदा शाहरुखने अबराम लहान असताना त्याला महाभारतामधील कथा सांगितल्याचे म्हटले होते. तसेच या कथा सांगताना त्याने त्यामध्ये काही बदल केल्याचे देखील सांगितले होते.

ट्रेंडिंग न्यूज

शाहरुख खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २०१७ सालचा असून या व्हिडिओमध्ये शाहरुख पत्रकार परिषदेत सांगताना दिसत आहे की, तो गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचत आहे. इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये तो आपला धाकटा मुलगा अबरामला महाभारताच्या कथा सांगतो, पण थोड्याफार बदलाने. आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, शाहरुख अबरामला महाभारताच्या कथा का सांगतो? यावर शाहरुख काय म्हणाला वाचा.
वाचा: गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या प्रेक्षकांकडून

शाहरुख महाभारतातील कथा का सांगतो?

२०१७ मध्ये ईदनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत शाहरुख खान म्हणाला होता की, "माझ्या आई-वडिलांनी मला प्रत्येक धर्माबद्दल सांगितले आहे. जेव्हा मी रामलीलेला गेलो तेव्हा ते खुश होते. जेव्हा मी ईदला गेलो तेव्हा देखील ते खुश झाले होते. आई-वडिलांप्रमाणेच मी माझ्या मुलांनाही सर्व धर्मांबद्दल शिकवण्याचा प्रयत्न करत आहे."
वाचा: 'भारतात २०१४मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याची प्रचंड क्रेझ होती', रत्ना पाठक यांनी सांगितला किस्सा

इस्लामच्या कथांबद्दल शाहरुख काय म्हणाला?

"मी गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचत आहे कारण मला त्या कथा खूप आवडतात. मी ही गोष्ट अबरामला ही सांगितली. हो! त्याला आनंद झाला. पण या कथा सांगताना मी थोडे बदल केले. त्याचप्रमाणे इस्लामविषयी मला ज्या कथा माहित आहेत, त्या ही मी रंजक पद्धतीने त्याला सांगतो. आशा आहे की तो सर्व धर्मांमधून शिकेल आणि त्या प्रत्येक धर्माचा तो आदर करेल" असे शाहरुख म्हणाला.
वाचा: बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

WhatsApp channel