मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: शाहरुखची जादू! चार दिवसात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाईचा आकडा पाहून व्हाल आवाक

Pathaan: शाहरुखची जादू! चार दिवसात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाईचा आकडा पाहून व्हाल आवाक

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2023 09:00 AM IST

Shahrukh Khan: चार दिवसात शाहरुख खानच्या पाठणने जबरदस्त कमाई केली आहे. जवळपास दिवसाला १०० कोटी रुपये कमावत असल्याचे दिसत आहे.

शाहरुख खान
शाहरुख खान (HT)

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतरही शाहरुखची जादू तसूभरही कमी झालेली नाही. पठाण या चित्रपटाने चार दिवसात बक्कळ कमाई केली आहे.

पठाण हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटाने ५७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर तीन दिवसात चित्रपटाने ३१३ कोटी रुपये कमावले आहेत. पठाणची जादू कायम आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाने जवळपास १०० कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. चित्रपटाने एकूण ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे जगभरातील चौथ्या दिवसाचे कलेक्शन हे ४१४ ते ४२५ कोटी रुपये आहे. विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळते.
वाचा: रणबीरने चाहत्याचा फोन का फेकला? सत्य आले समोर Video Viral

पठाण चित्रपट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जणू काही जादू केली आहे. कमाईच्या बाबतील शाहरुखच्या चित्रपटाने २१ नवे रेकॉर्ड केले आहेत. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग