बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहरुख सोबत अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, सुनील ग्रोवर, संजय दत्त, रिद्धी डोगरा आणि लहर खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट अद्याप ज्या प्रेक्षकांनी पाहिला नाही त्यांना चित्रपटाची कथा नेमकी काय असणार? हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची कथा...
जवान या २ तास ५० मिनिटांच्या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. सोबतच काही भावनिक सीन्स शाहरुखने दिले आहेत. या चित्रपटात शाहरुखची कथा दाखवण्यात आली आहे जो देशासाठी लढत असतो. तो एका सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष करत असतो. त्याच्या पात्राचे नाव विक्रांत राठोर असे आहे. तो शेतकरी, मजदूर कामकारांसाठी काम करत असतो. यासाठी त्याच्यासोबत एक टीम काम करत असते. भारतीय अर्थव्यवस्था किंवा यंत्रणा सर्वसामान्य लोकांना नाराज करते तेव्हा विक्रांत आवाज उठवतो. तसेच निवडणूका आल्या की राजकारण्यांचे राजकारण कशा प्रकारे सुरु होते हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे.
वाचा: 'जवान'साठी शाहरुखने घेतलेले मानधन ऐकून बसेल धक्का
'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शन अटली यांनी केले आहे. त्यांनी आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहेत. त्यामुळे चित्रपटाती प्रत्येक अॅक्शन सीन हा पाहाण्यासारखा आहे. चित्रपट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. चित्रपटातील शाहरुखचा अभिनय हा एकदम नैसर्गिक वाटत आहे. नयनताराने भलतीच भाव खाऊन गेली आहे. तिचा अभिनय तर उत्कृ्ष्ट आहेच सोबतच तिने दिलेले अॅक्शन सीन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपटातील शाहरुखचे वेगवेगळे लूक हे सर्वांचे लक्ष वेधतात. विजय सेतुपतीचा काली अवतार, तसेच अॅक्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट सर्वांनी आवार्जुन बघावा असा आहे.
या चित्रपटाच्या कमाई विषयी बोलायचे झाले तर चित्रपटाने चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८७ कोटी ०६ लाख रुपये कमावले आहेत. लवकरच चित्रपट ३०० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे बजेट हे २०० कोटी रुपये आहे.