Jawan: 'जवान'ने रचला इतिहास! पठाणचा रेकॉर्ड मोडत पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
Jawan Box Office Collection: 'जवान' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तुफान कमाई केली होती. आता प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
बॉलिवूडचा शहेनशाह शाहरुख खानने 'झीरो' चित्रपट सुपर फ्लॉप ठरल्यानंतर जवळपास चार वर्षांनंतर 'पठाण' या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक केले आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. त्यापाठोपाठ आता शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने देखील प्रदर्शनापूर्वी कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आता पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
समोर आलेल्या माहितीनुसार, 'जवान' चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपये कमावले आहेक. हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने ६५ कोटी रुपये कमावले, तमिळमधील चित्रपटाने ५ कोटी आणि तेलुगूमधील चित्रपटाने ५ कोटी रुपये कमावले आहेत. शाहरुखच्या पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी ७०.५० कोटी कमावले होते. पाचव्या दिवशी देखील पठाणने ६०.७५ कोटी कमावले होते. सर्वाना आशआ आहे की 'जवान' हा चित्रपट कमाईच्या बाबतील पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करेल.
वाचा: कसा आहे शाहरुखचा 'जवान' सिनेमा? जाणून घ्या ट्विटर रिव्ह्यू
मीडिया रिपोर्टनुसार, ‘जवान’ची ७ लाखांहून अधिक तिकिटे अॅडव्हांस बुकिंगमध्ये विकली गेली आहेत. या चित्रपटाने अॅडव्हांस बुकिंगच्या ३ दिवसात सुमारे २१.१४ कोटी रुपये कमावले आहेत. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारख्या अभिनेत्रीही झळकले आहेत. दीपिका पदुकोण, विजय सेतुपती हे कलाकार देखील चित्रपटात दिसत आहेत.
विभाग