बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे शाहिद कपूर. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या शाहिदला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. लवकरच शाहिद 'देवा' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्याने मुलांच्या भविष्यावर वक्तव्य केले आहे. त्याने थेट मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करू नये असे म्हटले आहे. शाहिद असं का म्हणाला चला जाणून घेऊया...
'देवा' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये शाहिद कपूर हा व्यक्त आहे. प्रमोशनसाठी त्याने राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये शाहिदला विचारण्यात आले की, 'त्याच्या मुलांनी त्याच्याकडून काही शिकायला हवं आणि काय शिकू नये.' त्यावर शाहिदीने उत्तर दिले की, 'नेहमी योग्य काम करा, मला आवडले किंवा दुसऱ्या कोणाला आवडेल म्हणून त्यांनी कधीच कोणते काम करू नये. त्यांनी नेहमी चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा. इतर लोक काय बोलतात याचा मला जराही फरक पडत नाही.'
पुढे शाहिद म्हणाला, 'अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी माझ्याकडून घेऊ इच्छित नाही. मला वाटते त्यापेक्षा जास्त आत्मविश्वास त्यांनी ठेवावा अशी माझी इच्छा आहे. मला तेवढा आत्मविश्वास नव्हता. त्यांनी माझं काम करावं असंही मला वाटत नाही, चित्रपटात पडू नये. आणखी काही तरी करा, खूप चढ-उतार येतात. जर त्यांनी तसे केले तर ती त्यांची निवड आहे, परंतु त्यांनी काहीतरी सोपे निवडावे अशी माझी इच्छा आहे. हे अतिशय गुंतागुंतीचे विश्व आहे.'
वाचा: AskSRKमध्ये चाहत्याने मागितला शाहरुखकडे ओटीपी, मुंबई पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर
शाहिदच्या देवा या चित्रपटाविषयी बोलताना अभिनेता म्हणाला होता की, 'देवा माझ्या हृदयाचा एक भाग आहे. अनेक वर्षापासून प्रेक्षकांना आकर्षित करेन असा सिनेमा करण्याची माझी इच्छा होती. हा त्याच पठडीमधील सिनेमा आहे. माझ्यासाठी माझ्या प्रवासातील ही पुढची पायरी आहे. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चित्रपट आहे. देवच्या व्यक्तिरेखेत बरेच काही आहे जे मी आत्ता उघड करणार नाही. तुम्ही स्वतः पाहावे.' देवा या सिनेमात शाहिद कपूरसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या