बॉलिवूड कलाकार हे जवळपास सगळ्याच इवेंटला पोहोचतात. नुकताच मुंबईत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडाचा देखील समावेश आहे. या दोघांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद विजयला किस करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विजय देवकरकोंडा हा स्टेजवर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या शेजारी अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसत आहे. तेवढ्याच शाहिद तेथे येतो आणि विजयच्या खांद्यावर डोके ठेवतो. शाहिद म्हणतो, 'माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप प्रे आहे. जर अर्जुन रेड्डी बनला नसता तर कदाचित कबिर सिंगचा जन्म झाला नसता. धन्यावाद विजय.' हे सगळं बोलून झाल्यावर शाहिद अर्जुनच्या गालावर किस करतो.
वाचा: फायटर ते ऐ वतन मेरे वतन; 'या' आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका
शाहिदचा अर्जुनच्या गालावर किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'गे चित्रपटात या दोघांना कास्ट करा आणि यांचा रोमॅन्स दाखवा' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'हे काय सुरु आहे दोघांचे' अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर विजय आणि शाहिदच्या या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
वाचा: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलेत का? मराठीसह हिंदी मालिकांमध्ये करते काम
शाहिद कपूरचा कबीर सिंग हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर कबीर सिंगच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. अर्जुन रेड्डी या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. कबीर सिंग चित्रपटापूर्वी अर्जुन रेड्डी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या कार्यक्रमात शाहिद कपूरने अर्जुनचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या