बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहिद कपूर आज (२५ फेब्रुवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. शाहिदचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी नवी दिल्लीत झाला. शाहिद कपूरचा जन्म इंडस्ट्रीतील मोठ्या घरता झाला. पण, इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.
शाहिद अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलम अझीम यांचा मुलगा आहे. शाहिद ४ वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. शाहिद आज त्याच्या मेहनतीच्या बळवार इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.
शाहिद कपूर त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि लूकसाठी ओळखला जातो. याशिवाय तो एक उत्तम डान्सर आहे. एक काळ असाही होता, जेव्हा शाहिद बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायचा. 'दिल तो पागल है' आणि 'ताल' सारख्या चित्रपटांमध्ये शाहिद बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसला. यानंतर तो अनेक जाहिरातींमध्येही दिसला.
प्रदीर्घ संघर्षानंतर शाहिदने २००३ मध्ये 'इश्क विश्क' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात त्याला खूप पसंती मिळाली. यानंतर शाहिद अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसला.
शाहिद कपूरने 'फिदा', 'दिल मांगे मोर', 'दिवाने हुए पागल', 'वाह!' असे चित्रपट केले आहेत. २००६ मध्ये रिलीज झालेला सूरज बडजात्याचा 'विवाह' हा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर २००७ मध्ये इम्तियाज अलीच्या 'जब वी मेट' चित्रपटात शाहिद आदित्य कश्यपच्या भूमिकेत दिसला होता. शाहिदचा हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे.
यानंतर २००९ मध्ये रिलीज झालेल्या विशाल भारद्वाजच्या 'कमिने' चित्रपटात शाहिदने दमदार अभिनय केला, ज्यामुळे तो खूप पुन्हा चर्चेत आला. याशिवाय तो 'हैदर', 'उडता पंजाब', 'पद्मावत' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला आहे. यानंतर २०२०-२१ मध्ये रिलीज झालेल्या 'कबीर सिंह' या चित्रपटाने शाहिदच्या करिअरला पुन्हा एकदा उंचीवर नेले. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटावर बरीच टीका झाली, पण शाहिदचा अभिनय सर्वांनाच आवडला.
शाहिद कपूर यावर्षी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये दिसला आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.
आता शाहिदच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो खूप विलासी जीवन जगतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूरची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपये आहे. गेल्या काही वर्षात त्याच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. एका चित्रपटासाठी शाहिद जवळपास १५ कोटी रुपये घेतो. त्याच वेळी, तो जाहिरातींसाठी सुमारे ४ कोटी रुपये घेतो. पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्याने मीरा राजपूतसोबत लग्न केले आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे.