मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahid Kapoor : शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? निर्मात्यांसोबत चर्चा सुरू

Shahid Kapoor : शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? निर्मात्यांसोबत चर्चा सुरू

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 04, 2024 11:15 AM IST

Shahid Kapoor As A Chhatrapati Shivaji Maharaj: लवकरच शाहिद कपूर एक मोठा ऐतिहासिक प्रोजेक्ट साईन करू शकतो, असे म्हटले जात आहे.

Shahid Kapoor As A Chhatrapati Shivaji Maharaj
Shahid Kapoor As A Chhatrapati Shivaji Maharaj

Shahid Kapoor As A Chhatrapati Shivaji Maharaj: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. इंडस्ट्रीला 'कबीर सिंह', 'पद्मावत', 'जर्सी' आणि 'हैदर'सारखे अप्रतिम सिनेमे देणाऱ्या या अभिनेत्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच शाहिद कपूर एक मोठा ऐतिहासिक प्रोजेक्ट साईन करू शकतो, असे म्हटले जात आहे. शाहिद कपूरने याआधीच जॅकी आणि वासू भगनानीसोबत मेगा बजेट चित्रपट साइन केला आहे. या दरम्यानच आता या पीरियड ड्रामा चित्रपटाविषयी माहिती समोर आली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता छत्रपती शिवाजी महाराहांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘पिंकविला’च्य रीपोर्टनुसार, सद्य शाहिद कपूर ‘ओएमजी २’ चित्रपटाच्या निर्मात्यांशी बोलणी करत आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अश्विन वर्दे करणार आहेत. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी शाहिद कपूर आणि अश्विन यांच्यात गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. आतापर्यंत सर्व काही ठीक चालले आहे आणि योजनानुसार गोष्टी पुढे जात आहेत. आहेत.’

Urmila Matondkar Birthday: कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरचं करिअर ‘या’मुळे झालं उद्ध्वस्त!

आतापर्यंत, अभिनेता शाहिद आणि निर्माते या प्रकल्पासाठी योग्य दिग्दर्शकाच्या शोधात आहेत. परंतु अमित राय यांच्याशी अनेक संभाषणानंतर, शाहिद कपूरला वाटते की, भारतीय इतिहासातील ही महाकथा सांगण्यासाठी तो योग्य असेल. हा चित्रपट पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महान कथा आणि त्यांच्या शौर्याचे अनोख्या शैलीत कथन करेल आणि सध्या या चित्रपटासाठी निर्माते शीर्ष स्टुडिओशी चर्चा करत आहेत जेणेकरून प्री-प्रॉडक्शन सुरू होईल.

या अहवालात चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, शाहिद कपूरने या चित्रपटावर काम करण्यास होकार दिला आहे, परंतु स्टुडिओ प्रकल्पात सामील झाल्यानंतर सर्व पेपर वर्क आणि घोषणा केल्या जातील. निर्माते सध्या अनेक उच्च स्तराशी चर्चा करत आहेत. स्टुडिओ आणि फायनान्सर्स सोबत बोलत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील हा सर्वात महागडा चित्रपट असू शकतो. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी पेपर वर्क पूर्ण होईपर्यंत नावही फायनल होणार असल्याचे वृत्त आहे.

WhatsApp channel

विभाग