मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  काय झाडी, काय डोंगार,लैच ओके हाय..., हिंगोलीच्या शंतनूचा जबरा व्हिडीओ व्हायरल
shahaji patil viral audio
shahaji patil viral audio
27 June 2022, 13:10 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 13:10 IST
  • (shahaji patil viral audio)शहाजी पाटील यांची ही फोन रेकोर्डिंग सोशल मीडियावर वायरल झाली. त्यात ते गुवाहाटीच्या निसर्गाचं आणि हॉटेलचं कौतुक करत आहेत. 

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता पुढे नक्की काय घडणार, शिवसेना काय पाउल उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. मात्र काही दिवसांपासून शिंदे गटातील (shahaji patil viral audio)एका नेत्याची फोनवरची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर वायरल होतेय. शहाजी पाटील यांची ही फोन रेकोर्डिंग सोशल मीडियावर वायरल झाली. त्यात ते गुवाहाटीच्या निसर्गाचं आणि हॉटेलचं कौतुक करत आहेत. आता त्यांच्या या शब्दांवर हिंगोलीच्या एका अवलियाने चक्क गाणं तयार केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यापूर्वी यशराज मुखाते याच्या 'रसोडे में कौन था' ने प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर शहनाज गिल हिच्या 'साद्दा कुत्ता कुत्ता' ने देखील प्रेक्षकांना हसवलं होतं. आता हिंगोलीच्या शंतनू पोळे या युवकाने शहाजी पाटील यांच्या 'काय झाडी, काय हाटेल... या वाक्याचं छोटंसं गाणं तयार केलं आहे. हे गाणं देखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. हे गाणं ऐकून पुन्हा एकदा नेटकरी पोट धरून हसत आहेत. शंतनूचं हे गाणं लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनीही त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलं आहे.

शंतनूचं हे गाणं सोशल मीडियावर वायरल होत आहे. नेटकरीही गाण्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. खरंच कसलं छान बसलंय, बरोबर पॉईंट पकडलेत तू असं म्हणत नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.