बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चाहत्यांची मने जिंकत आला आहे. नुकताच शाहरुखने दिल्लीतील एका लग्नाला हजेरी लावली. या लग्नात त्याने वधूसोबत डान्स करत तिच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवसाला आणखी खास बनवले आहे. एका मेकअप आर्टिस्टने हा लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख वधूची प्रशंसा देखील करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान डायलॉग मारताना दिसत आहे. २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या जब तक है जान चित्रपटातील डायलॉगची पुनरावृत्ती करत शाहरुख म्हणतो, “मी तुला सांगू इच्छितो की तू खूप सुंदर आहे. तुझ्याकडे बघून मला एवढच म्हणायचे आहे की, माशाअल्लाह! तू खरच खूप सुंदर आहेस.”
नवरीच्या मेकअप आर्टिस्ट अमृत कौरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाहरुखचा हा व्हिडीओ शेअर करत अमृत कौरने लिहिले की, "शाहरुख खान, ज्या प्रकारे तू माझ्या वधूचे कौतुक केलेस, माझा दिवस बनला आहे. त्या दिवशी माझी मेहनत फळाला आली." सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत शाहरुखच्या मानधनाविषयी देखील विचारले आहे. अमृतने त्यावर प्रतिउत्तर देखील दिले आहे.
वाचा: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओवर शाहरुखच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, 'ही सर्वात नशीबवान मुलगी आहे.' तर एकाने लिहिले की, कोणीतरी माझे स्वप्न पूर्ण केले आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत शाहरुखने या लग्नात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतले असा प्रश्न विचारला. यातील एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना मेकअप आर्टिस्टने सांगितले की, शाहरुख हा वधू-वरांचा फॅमिली फ्रेंड आहे. तर शाहरुखने किमान ६० लाख किंवा त्यापेक्षा जास्त पैसे घेतले असावेत, अशी कमेंट लोकांनी केली आहे.
संबंधित बातम्या