Shah Rukh Khan Family: शाहरुख खान सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पाच्या चरणी; लेक सुहाना खानने वेधलं लक्ष!-shah rukh khan with family at mukesh ambani house for ganpati celebration 2023 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan Family: शाहरुख खान सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पाच्या चरणी; लेक सुहाना खानने वेधलं लक्ष!

Shah Rukh Khan Family: शाहरुख खान सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पाच्या चरणी; लेक सुहाना खानने वेधलं लक्ष!

Sep 20, 2023 11:21 AM IST

Shah Rukh Khan With Family At Ambani House: अंबानींच्या घरी गणेशोत्सवात सामील झालेला शाहरुख खान यावेळी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसला. त्याचा ‘पठाण’ लूक त्याला खूपच शोभून दिसत होता.

Shah Rukh Khan With Family At Ambani House
Shah Rukh Khan With Family At Ambani House

Shah Rukh Khan With Family At Ambani House: अवघ्या देशभरात गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच बाप्पाच्या आगमनाच्या जल्लोषात रमलेले दिसत आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरात अर्थात अँटिलियामध्येही गणेशोत्सवाच्या खास सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. या खास कार्यक्रमात बी-टाऊनचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये सलमान खान, अजय देवगण, आलिया भट्ट अशा अनेक स्टार्संनी हजेरी लावली होती. मात्र, यावेळी सर्वांचे लक्ष शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाकडे वेधले गेले. या गणेशोत्सव कार्यक्रमात शाहरुख खान सुहाना, अबराम आणि गौरी खानसोबत पोहोचला होता.

अंबानींच्या घरी गणेशोत्सवात सामील झालेला शाहरुख खान यावेळी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसला. त्याचा ‘पठाण’ लूक त्याला खूपच शोभून दिसत होता. यावेळी शाहरुखने वाईन मरून रंगाचा कुर्ता घातला होता. तर, अबराम पेस्टल ब्लू रंगाच्या चमकदार कुर्त्यामध्ये दिसला. गौरी आणि सुहानाने ऑफ-व्हाईट रंगाचे सलवार सूट परिधान केले होते, ज्यात त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या. यावेळी शाहरुख खानच्या हातातील घड्याळावरही सगळ्यांचे लक्ष गेले.

OTT Release Marathi: ओटीटीवर साऊथचा तडका; थलापती विजयचा ‘हा’ गाजलेला चित्रपट मराठीतही पाहा!

या गणेशोत्सवा दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये शाहरुख खान मुलगा अबरामचा हात धरताना दिसला आहे. शाहरुख खानचे फोटो आणि व्हिडीओ चाहते खूप शेअर करत आहेत. त्याचबरोबर नेटकरी सुहाना खानच्या ड्रेसचे, तिच्या लूकचे आणि स्टाईलचे तोंडभरून कौतुक करत आहेत. खान कुटुंबाच्या या पारंपारिक लूकने अँटिलियाच्या गणेशोत्सवाची शोभा आणखी वाढवली आहे.

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच त्याचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. ५०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झालेला शाहरुख खानचा हा या वर्षातील दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण ५०६.८८ कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या दोन आठवड्यानंतरही ही जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे.