Viral Video: किंग खानसमोर थरथर कापायला लागला चाहता; मात्र शाहरुखच्या प्रेमानं जिंकलं सगळ्याचं मन!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: किंग खानसमोर थरथर कापायला लागला चाहता; मात्र शाहरुखच्या प्रेमानं जिंकलं सगळ्याचं मन!

Viral Video: किंग खानसमोर थरथर कापायला लागला चाहता; मात्र शाहरुखच्या प्रेमानं जिंकलं सगळ्याचं मन!

Jan 30, 2024 05:13 PM IST

Shah Rukh Khan Viral Video: सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे शाहरुख खान आता चांगलाच चर्चेत आला आहे.

Shah Rukh Khan Viral Video
Shah Rukh Khan Viral Video

Shah Rukh Khan Viral Video: बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान याची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर संपूर्ण जगात त्याने आपल्या अभिनयाच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हे स्थान पटकावले आहे. गत वर्षी शाहरुख खानचे तीन चित्रपट रिलीज झाले. या तीनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. आता शाहरुख यावर्षीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे शाहरुख खान आता चांगलाच चर्चेत आला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गेल्या वर्षी २८ डिसेंबरला पार पडलेल्या ‘डंकी’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. 'डंकी' चित्रपटाच्या यशानंतर मुंबईत एका फॅन मीटचे आयोजन करण्यात आले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहरुख स्टेजवर उभा आहे आणि त्याचा चाहता त्याला भेटायला स्टेजवर आला आहे. यावेळी शाहरुख खानला पाहताच त्याचा चाहता रडू लागला आणि शाहरुख खानसमोरच थरथर कापू लागला होता. मात्र, यावेळी शाहरुख खानने आपल्या चाहत्याला अतिशय प्रेमाने थोपटली आणि त्याला शांत केले. आता नेटकरी शाहरुख खानच्या या कृतीचे खूप कौतुक करत आहेत. त्याच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Pulkit Samrat-Kriti Kharbanda: पुलकित-क्रितीने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटोंमध्ये दिसली अंगठ्यांची झलक!

या व्हिडीओमध्ये शाहरुख खान स्टेजवरून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. या दरम्यान त्याचा एक फॅन जवळ येतो. यावेळी शाहरुख खानला पाहून चाहता थरथर कापू आणि रडू लागला. हे पाहून शाहरुखलाही स्वत:ला रोखता आले नाही आणि त्याने चाहत्याला मिठी मारली. चाहत्याला शांत करण्यासाठी शाहरुखने त्याला मिठी मारली, त्याचा हात धरला आणि त्याच्यासोबत फोटोही काढले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते आणि नेटकरी शाहरुखच्या या स्टाईलचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानच्या या व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाहरुख खानने आपल्या अभिनयानेच नव्हे तर, दिलदार स्वभावाने देखील सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. शाहरुख खानचे असे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात, ज्यामध्ये तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करताना दिसतो. शाहरुख खान आपल्या प्रत्येक चाहत्याचा खूप आदर करतो.

Whats_app_banner