Shah Rukh Khan Viral Video: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा प्री-वेडिंग सोहळा सध्या गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे. प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. प्री वेडिंगच्या पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही या सोहळ्यामध्ये कलाकारांनी चांगलाच कल्ला केला होता. या सोहळ्यात अनंत-राधिकाने आपल्या भाषणाने लोकांची मने जिंकली आहे, तर शाहरुख खाननेही या सोहळ्यात जय श्रीरामचे नारे दिले आहेत.
सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक स्टार्सनी या सोहळ्यामध्ये प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. या सोहळ्यात पॉप गायिका रिहानाही उपस्थित होती, तिने आपल्या गाण्यांनी सगळ्याच पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले होते. दरम्यान, बॉलिवूड गायकांपैकी दिलजीत दोसांझने देखील 'तेरा नई मैं लवर' या हिट गाण्यावर परफॉर्म केले.
यादरम्यान शाहरुख खानने अंबानी कुटुंबाची सुंदर ओळख करून दिली. 'जय श्री राम' म्हणत त्याने भाषणाला सुरुवात केली. यावेळी किंग शाहरुख खान म्हणाला, ‘तुम्ही सर्वांनी डान्स परफॉर्मन्स पाहिला. सगळे भाऊ नाचले, बहिणी नाचल्या... पण या सोहळ्याबद्दल बोलायचे तर, प्रार्थना आणि आशीर्वादांशिवाय हा सोहळा पुढे जाऊच शकत नाही. तर, मी तुम्हा सर्वांना अंबानी कुटुंबातील पॉवरपफ गर्ल्सची ओळख करून देतो, ज्या या कुटुंबातील त्रिमूर्ती आहेत- सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती.’ यानंतर शाहरुख खानने कोकिलाबेन अंबानी, पूर्णिमा दलाल आणि देवयानी खिमजी यांची नावे घेतली. शाहरुख खान याने म्हटले की, या तीन महिला अंबानी कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत.
आज अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज 'टस्कर ट्रेल्स' आणि 'सिग्नेचर' हे कार्यक्रम होणार आहेत. 'टस्कर ट्रेल्स' हा एक मैदानी कार्यक्रम असणार आहे, या ठिकाणी पाहुण्यांना जामनगरचे सौंदर्य दाखवले जाईल. तर, दुसऱ्या कार्यक्रमासाठी सगळे भारतीय पोशाखात दिसणार आहेत.