Jawan Twitter Review: कसा आहे शाहरुखचा 'जवान' सिनेमा? जाणून घ्या ट्विटर रिव्ह्यू
आज ७ सप्टेंबर रोजी शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडून जवान मूव्ही कसा आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'जवान' हा चित्रपट आज ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. जगभरातीला चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाच्या अडवान्स बुकींगने अनेक रेकॉर्ड केले आहेत. आज सकाळी ५ वाजता जवनाचा पहिला शो लावण्यात आला होता. आता जवान हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया जवानचा ट्विटर रिव्ह्यू...
ट्रेंडिंग न्यूज
पहाटे ५ वाजल्यापासूनच जवान चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ट्विटरवर #JawanTsunamiTomorrow, #JawanFirstDayFirstShow, #JawanAdvanceBookings, #ShahRuhKhan, #Atlee हे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून जवान चित्रपटाचा रिव्ह्यू देत आहेत.
वाचा: 'जवान'साठी महेश बाबूने केले ट्वीट, शाहरुखने दिली प्रतिक्रिया...
एका यूजरने चित्रपटाबाबत म्हटले की, 'शाहरुख खानसाठी लोक वेडे आहेत. नाही तर इतक्या पाहाटे कोण आले असते चित्रपट पाहाण्यासाठी.' सोबतच या यूजरने सोशल मीडियावर थिएटर बाहेरचा व्हिडीओ शेअर केला आहे.
दुसऱ्या एका यूजरने चित्रपटाविषयी लिहिताना 'शाहरुखचा जवान हा चित्रपट आग आहे आग' असे म्हणत #JawanFirstDayFirstShow #ShahRuhKhan या दोन हॅशटॅगचा वापर केला आहे.
तिसऱ्या एका यूजरने 'जवान चित्रपट काय आहे यार... शाहरुखने चित्रपटात कमाल केली आहे आणि अटली यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा असेल हा. मी आशा करतो की हा चित्रपट जूने सर्व रेकॉर्ड मोडेल' असे म्हटले आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'जवान' चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. 'जवान ब्लॉकबस्टर होणार आहे. अटली यांचा हा मास्टर पिस आहे. हे वर्ष बदशाहचे आहे. विजय सेतुपती, नयनतारा आणि इतरांचा अभिनय सुंदर आहे. चित्रपट नक्की पाहा' या आशयाचे ट्वीट तरण आदर्श यांनी केले आहे.
‘जवान’ या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच किंग खान याआधी कधीही न पाहिलेल्या भन्नाट अवतारामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट आज म्हणजेच ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘जवान’चे अॅडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाले होते. पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या 'जवान'ने त्याच्याच 'पठान' चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. सुरुवातीच्या अवघ्या २४ तासांत ‘जवान’ने ‘पठान’पेक्षा जास्त अॅडव्हान्स बुकिंग मिळवली आहे.
विभाग