Shah Rukh Khan use 17 Phones: अभिनेता-निर्माता विवेक वासवानी यांनी शाहरुख खानला हिंदी चित्रपटसृष्टीत आणले होते. त्यांनीच शाहरुखच्या हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्रीची योजना आखली होती. इतकंच नाही तर, संघर्षाच्या काळात त्यांनी शाहरुख खण याला आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता शाहरुख आणि विवेक एकमेकांशी फार बोलत नाहीत. गेल्या चार वर्षांपासून दोघेही भेटले नसल्याचा दावा विवेक यांनी केला आहे. तर, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'जवान'च्या यशानंतर शाहरुखला फोन केल्यावर काय घडले हेही विवेकने सांगितले.
विवेक वासवानी यांनी नुकतीच सिद्धार्थ कन्नन याला मुलाखत दिली. या मुलाखतीत विवेक यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी शाहरुखची आणि त्यांची भेट शाहरुख खानच्या वाढदिवशी झाली होती. यावेळी विवेक म्हणाला, 'आमच्यात तसे कोणतेही नातेसंबंध नाहीत. आम्ही फार बोलत नाही आणि भेटतही नाही. पण, जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा असे वाटत नाही की आम्ही वर्षानुवर्षे भेटलो नाही.’ आता आगामी चित्रपटांमध्ये शाहरुखची मुलगी सुहानासाठी दिग्दर्शन करायचे आहे, अशी इच्छा विवेक यांनी बोलून दाखवली आहे. आता शाहरुख खानच्या लेकीसाठी देखील ते चित्रपट करणार आहेत. यावेळी त्यांनी शाहरुख खानच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या.
या मुलाखतीत विवेक वासवानी म्हणाले की, ‘मला वाटते सुहानामध्ये खूप क्षमता आहे. तिच्याकडे सध्याच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त टॅलेंट आहे. २०१८मध्ये जेव्हा शाहरुखने बर्थडे पार्टी आयोजित केली होती, तेव्हा त्याने मला कॉल केला होता. तेव्हा तो मला म्हणाका की, सर तुम्ही माझ्या मुलांना भेटावे अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी मी गेलो आणि मी त्याच्या पार्टीचा खूप आनंद घेतला. आणि त्याच्या मुलांना देखील भेटलो.’
या मुलाखतीत सिद्धार्थने विवेकला प्रश्न विचारला की, ‘गेल्या चार वर्षात तुम्ही तुमच्या मित्राला फोन केला की नाही?’ यावर उत्तर देताना विवेक म्हणाल की, ‘शाहरुख खानकडे एक नाही तर, १७ फोन आहेत. पण, माझ्याकडे त्याचा एकच नंबर आहे. एकदा ‘जवान’नंतर मी त्याला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. यानंतर मी अंघोळ करायला गेलो, तेव्हा त्याने परत मला कॉल केला. पण, त्यावेळी मी फोन उचलू शकलो नाही. तो सतत प्रवास करत असतो. त्याच्यावर सध्या खूप जबाबदाऱ्या आहेत. तो बॉलिवूडचा बादशाह आहे.’
संबंधित बातम्या