Shahrukh Khan : अभिनेता शाहरुख खानच्या डोळ्याला दुखापत, उपचारासाठी जाणार परदेशात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahrukh Khan : अभिनेता शाहरुख खानच्या डोळ्याला दुखापत, उपचारासाठी जाणार परदेशात

Shahrukh Khan : अभिनेता शाहरुख खानच्या डोळ्याला दुखापत, उपचारासाठी जाणार परदेशात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 30, 2024 11:36 AM IST

Shahrukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या डोळ्याला नेमकं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Shah Rukh Khan to undergo urgent medical treatment
Shah Rukh Khan to undergo urgent medical treatment

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. तसेच त्याच्या खासगी आयुष्याविषयी देखील जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. आता किंग खानच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यासाठी शाहरुख परदेशात जाणार असून तिकडे डॉक्टरांकडून उपचार घेणार आहे. आधी शाहरुख मुंबईत उपचार घेत होता. पण त्याने बरे वाटत नसल्यामुळे तो परदेशात उपचारासाठी जाणार आहे.

शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला जाणार

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख सोमवारी म्हणजेच २९ जुलै रोजी मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. पण हे रुटिन चेकअप नव्हते. शाहरुख अचानक मुंबईतील एका रुग्णालयात केल्यामुळे सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. पण आता मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फार फरक पडला नसल्यामुळे तो अमेरिकेला जाणार आहे.

शाहरुखने घेतला ब्रेक

याआधी मे महिन्यात स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शाहरुखने सांगितले होते की, २०२४मध्ये तो पुन्हा चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. त्यासाठी त्याने वेगळे वेळापत्रक आखले आहेत. गेल्या शाहरुखचे लागोपाठ तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतर शाहरुखने थोडा ब्रेक घेतला. 'डंकी' हा शेवटचा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्याआधी त्याने जवान आणि पठाण हा चित्रपट केला होता.

'मला वाटलं की मी थोडी विश्रांती घेऊ शकेन. मी ३ सिनेमे केले आहेत आणि त्यात खूप फिजिकल वर्क होते, मी थोडी विश्रांती घेईन. मी टीमला सांगितले की मी सामना पाहण्यासाठी येईन आणि चांगली गोष्ट म्हणजे मी ऑगस्ट मध्ये शूटिंग सुरू करणार की जुलैमध्ये हे अजून ठरलेलं नाही' असे शाहरुख म्हणाला होता.
वाचा: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी

शाहरुखच्या चित्रपटाविषयी

शाहरुख लवकरच 'किंग' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मुलगी सुहाना खानदेखील दिसणार आहे. पहिल्यांदाच दोन्ही बाप-लेक एकत्र काम करणार असून या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. तसेच शाहरुख ऑगस्ट महिन्यात चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.

Whats_app_banner