मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  SRK Throwback Holi: शाहरुख- गौरीचा अजब डान्स, होळीनिमित्त व्हायरल झाला थ्रोबॅक व्हिडीओ

SRK Throwback Holi: शाहरुख- गौरीचा अजब डान्स, होळीनिमित्त व्हायरल झाला थ्रोबॅक व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 08, 2023 08:45 AM IST

Shah rukh khan: शाहरुख खान आणि गौरीचा हा डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

शाहरुख खान आणि गौरी खान
शाहरुख खान आणि गौरी खान (HT)

होळीची मजा वर्षानुवर्षे मनात घर करून राहते. या दिवशी मित्रमैत्रिणी रंगवायचे असो किंवा गाणे, नाचणे असो, प्रत्येक क्षणाची स्वतःची मजा आणि आनंद असतो. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. तेही होळी साजरी करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नी गौरीसोबत अजब स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर शाहरुख आणि गौरीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख आणि गौरी मस्तीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून तुम्हालाही हसू येईल. शाहरुखने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे तर गौरीने गडद रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. त्या दोघांचा हा जुना व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: अमृता फडणवीसांनी लेकीसह व्हिडीओ शेअर करत होळीच्या दिल्या हटके शुभेच्छा

शाहरुखचा पठाण सुपरहिट

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली होती. ‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानही कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

IPL_Entry_Point