Aryan Khan Viral Video : न्यू इयर पार्टीनंतर आर्यन खान या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी करत असताना पॅपराझींना दिसला. मात्र, आता आर्यन खानची डळमळणारी पावले पाहून लोक त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलू लागले आहेत.
ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या मोठ्या पडद्यावरील पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आर्यनचा कल अभिनयापेक्षा पडद्यामागे काम करण्याकडे जास्त आहे. आर्यन खानमध्ये त्याचे वडील शाहरुख खान यांची झलक पाहायला मिळते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाहरुखचे चाहते आपल्या आवडत्या स्टारच्या समर्थनात उतरले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये आर्यन खान पांढरा टीशर्ट आणि निळ्या जॅकेटमध्ये बाहेर येताना दिसत आहे. त्याच्यासोबत अनेक बॉडीगार्ड आणि काही जवळचे मित्र देखील दिसत आहेत. पण आर्यन खान वर न बघता पुढे जाताना दिसत आहे. पॅपराझी आर्यन खानला आवाज देतात की, ‘आर्यन भाई आमच्यावर रागावले आहात का?’ . मात्र, या गर्दीत आर्यन खान काहीही न बोलता शांतपणे निघून जातो. पण, कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी त्याच्याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. एका सोशल मीडिया युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, ‘त्याची पार्टी जास्त झालीये वाटते.’
आणखी एका सोशल मीडिया युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं की, ‘वाह किती सरळ चालला आहे हा...’ एका युजरने लिहिले की, ‘तो मद्यधुंद आहे, शाहरुख खानसाठी वाईट दिवस आले आहेत.’ एका युजरने लिहिलं की, ‘यात सुधारणा होणार नाही. तर एका व्यक्तीने शाहरुख खानच्या मुलाच्या मूव्हची तुलना डान्सशी केली आहे.’ एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली की, ‘दुनिया वाले जीने नहीं देते बनाम दुनिया वाले पीने नहीं लेते’. या व्हिडिओवर अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत, तर काही चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आर्यनचा बचावही केला आहे.
आर्यन खानच्या मोठ्या पडद्यावरील पहिल्या प्रोजेक्टवर्कबद्दल बोलायचे झाले. तर, आर्यन त्याच्या पहिल्या प्रोजेक्ट 'स्टारडम'मुळे चर्चेत आहे. या मालिकेतून आर्यनचे दिग्दर्शकीय पदार्पण होत असून रेड चिलीज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली या मालिकेची निर्मिती केली जात आहे. आर्यन खान एका स्ट्रीटवेअर कंपनीचा सहसंस्थापक देखील आहे, ज्याच्या आउटफिटला खुद्द शाहरुख खाननेही पाठिंबा दिला आहे. आर्यन आणि शाहरुख खान अनेकदा या कंपनीचा आउटफिट परिधान करताना दिसले आहेत.
संबंधित बातम्या