Shah Rukh Khan: ‘मी सलमान खानच्या घरचं अन्न खाल्लंय’; शाहरुखने दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा!-shah rukh khan says i ate food from salman khans house actor remembers his struggle days ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘मी सलमान खानच्या घरचं अन्न खाल्लंय’; शाहरुखने दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा!

Shah Rukh Khan: ‘मी सलमान खानच्या घरचं अन्न खाल्लंय’; शाहरुखने दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा!

Aug 27, 2024 10:54 AM IST

Shah Rukh Khan Struggle Story: शाहरुख खानने पुन्हा एकदा त्याच्या संघर्षाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा तो मुंबईत नवीन होता आणि स्ट्रगल करत होता, तेव्हा सलमान खान त्याची काळजी घ्यायचा, असे शाहरुख म्हणाला.

Shah Rukh Khan and Salman Khan: शाहरुख खान आणि सलमान खान
Shah Rukh Khan and Salman Khan: शाहरुख खान आणि सलमान खान

Shah Rukh Khan Struggle Story: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला सगळेच प्रेमाने भाईजान म्हणतात. रियॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये गरज पडल्यास घरातील स्पर्धकांना जोरदार शाब्दिक हल्ले करताना दिसणारा सलमान खान त्यांच्या मैत्रीच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सर्रास सुरू असतात. अनेक सेलिब्रिटींनी म्हटले आहे की, सलमान तोंडाने स्वत:ची स्तुती करत नाही, पण जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तो तुमच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी एक असतो. शाहरुख खानची दबंग खानसोबतही खूप चांगली मैत्री आहे. स्ट्रगलच्या काळात आपण सलमान खानच्या घरात जेवायचो, असं शाहरुख खानने म्हटले आहे.

शाहरुख आणि सलमान खानची मैत्री

'टायगर ३' आणि 'पठान'मधील शाहरुख खान आणि सलमान खानची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. दोन्ही सुपरस्टार्सबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत, परंतु सत्य हे आहे की दोघांमधील मैत्री अतुलनीय आहे. आर्यन खानच्या अटकेच्या वेळी शाहरुख खानच्या घरी पोहोचणारा सलमान खान हा पहिला व्यक्ती होता. शाहरुख खानने एकदा त्याच्या संघर्षाच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यावेळी शाहरुखने सांगितले होते की, जेव्हा तो पहिल्यांदा मुंबईत आला, तेव्हा सलमान खानच्या कुटुंबियांनी त्याची खूप काळजी घेतली होती.

TMKOC: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!

शाहरुख खानने गंमत करत म्हटले की, सलमान खान त्याच्यापेक्षा लहान आहे, दोघांच्याही वयात दीड महिन्यांचा फरक आहे. शाहरुख म्हणाला, ‘पण सलमानने मोठ्या भावापेक्षा माझी जास्त काळजी घेतली आणि त्याच्या घरच्यांनी माझी खूप काळजी घेतली. आणि मी फक्त शिकलोच नाही, तर त्यांच्या घरचे जेवणही खाल्ले आहे.’ सलमान खान आणि शाहरुख खान 'दस का दम' या रियॅलिटी टीव्ही शोमध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय सलमान खान आणि शाहरुख खान ‘बिग बॉस १८’मध्ये एकत्र दिसले आहेत. पण, सगळ्यात मोठा धमाका तेव्हा झाला जेव्हा दोघे अनेक वर्षांनंतर एकत्र मोठ्या पडद्यावर परतले.

एकमेकांना दिली साथ

सलमान खानने शाहरुख खानच्या 'पठान' या चित्रपटातून कॅमिओ केला, तेव्हा चित्रपटगृहात तिकिटे मिळणे कठीण झाले होते. या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होऊ लागले आणि शाहरुख खानला बॉक्स ऑफिसवर एवढं दमदार कमबॅक मिळवून देण्यात सलमान खानचाही मोठा हात असल्याचं अनेकांचं मत होतं. आता हे दोन्ही स्टार्स 'टायगर व्हर्सेस पठान' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. बजेट आणि कमाईच्या बाबतीतही हा काही मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरू शकतो.