बॉलिवूडचा ‘किंग’ म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान सध्या त्याची कथित गर्लफ्रेंड आणि मॉडेल लॅरिसा बोनेसीसोबतच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आला आहे. पण, ही लॅरिसा बोनेसी कोण आहे? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात सतत येत असतो. ब्राझिलियन मॉडेल लॅरिसा आणि आर्यनच्या डेटींगच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. मात्र, याबाबत आर्यन किंवा लॉरिसा यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, आता दोघांचा एक क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लॉरिसा नाचताना फ्लाइंग कीस देताना दिसत आहे. तर, ते पाहून आर्यन खान गोड हसला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चाहतेही त्यांच्या डेटिंगच्या अफवांवर विश्वास ठेवत आहेत. लॅरिसा आणि आर्यन काही काळापूर्वी एकाच पार्टीत धमाल करताना दिसले होते. या व्हिडीओमध्ये आर्यन मार्टिन गॅरिक्सच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे आणि त्याच्या पाठीमागे विरुद्ध दिशेला लॅरिसा देखील नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लॅरिसा बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे आणि आर्यन पुन्हा पुन्हा मागे वळून तिच्याकडे पाहताना दिसत आहे.
दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडीटवर एका युजरने शेअर केला आहे, ज्यामध्ये आर्यन आणि लॅरिसा यांच्यात काहीतरी सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारण, या व्हिडीओमध्ये लॉरिसा डान्स करताना मध्येच फ्लाइंग किस देताना दिसत आहे. तर, व्हिडीओमध्ये नंतर आर्यनची एक झलक दिसली, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य दिसत आहे. आर्यनच्या या गोड स्माईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मात्र, दोघांनीही यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहते आता दोघांकडून जाणून घेण्यासाठी आतुर झाले आहेत.
सध्या आर्यन खान त्याच्या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. आर्यन खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर आर्यन त्याच्या दिग्दर्शनात बनणारी पहिली मालिका 'स्टारडम'साठी तयारी करत आहे. आर्यन आणि शाहरुख अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याची माहिती शेअर करत असतात. त्याचवेळी आर्यनचे चाहतेही त्याच्या प्रोजेक्टची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत, ज्यामध्ये शाहरुख खानची झलकही पाहता येणार आहे. नुकताच त्याने स्वतःचा क्लोदिंग ब्रँड देखील तयार केला आहे.