Shah Rukh Khan: शाहरुख खानने का नाकारला होता संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’? समोर आलं कारण-shah rukh khan reject padmaavat offer know the behind reason ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: शाहरुख खानने का नाकारला होता संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’? समोर आलं कारण

Shah Rukh Khan: शाहरुख खानने का नाकारला होता संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’? समोर आलं कारण

Jul 21, 2023 11:57 AM IST

Shah Rukh Khan Reject Padmaavat: संजय लीला भन्साळी यांचा सुपरहिट चित्रपट 'पद्मावत'मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आधी रणवीर सिंहऐवजी शाहरुख खान झळकणार होता.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan Reject Padmaavat: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचा सुपरहिट चित्रपट 'पद्मावत'मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आधी रणवीर सिंहऐवजी शाहरुख खान झळकणार होता. मात्र, शाहरुख खानने एका अटीमुळे या चित्रपटातून काढता पाय घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंहला हे पात्र ऑफर केले, तेव्हा त्याने होकार देण्यासाठी बराच वेळ घेतला होता. त्यामुळे संजय लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन थेट शाहरुख खानकडे गेले होते.

त्यावेळी शाहरुख खानने 'पद्मावत'ची कथा वाचली आणि त्यालाही ही भूमिका आवडली होती. पण, शाहरुख खानने संजय लीला भन्साळींना चित्रपटाचे नाव बदलण्यास सांगितले होते. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'पद्मावती' असे होते. रिपोर्टनुसार, शाहरुखने तेव्हा संजय लीला भन्साळी यांना असे सांगितले होते की, नायिकेच्या नावावर असलेल्या चित्रपटात त्याला पाहून चाहते नाराज होतील.

Karan Johar: करण जोहर बनवणार ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’! आता ‘या’ स्टारकिडला करणार लाँच

शाहरुख खानच्या या अटीमुळे संजय लीला भन्साळी चांगलेच अडचणीत आले होते. तर, दुसरीकडे या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोणने चित्रपटाचे नाव ‘पद्मावती’च राहावे, असा हट्ट धरला होता. शाहरुख आणि दीपिका दोघेही स्वतःच्या हट्टावर अडून बसले होते. त्याचवेळी संजय लीला भन्साळी यांचे टेन्शनही वाढत होते. पण, या दरम्यान रणवीर सिंहने या प्रोजेक्टसाठी भन्साळींना हो म्हटलं आणि या भूमिकेसाठी रणवीर सिंहची निवड करण्यात आली.

आता नेटकऱ्यांना शाहरुख खानची एक जुनी मुलाखत सापडली आहे. यामध्ये अभिनेता म्हणाला होता की, त्याला अनेक व्यक्तिरेखांची ऑफर आली होती, पण त्याने ती सोडली. शाहरुख म्हणालेला की, आपण आता कोणत्या स्थानी आहोत हे लक्षात घेऊन स्क्रिप्टची निवड करावी लागते. तर, सोशल मीडिया युजर्सच्या म्हणण्यानुसार खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीर हाच योग्य पर्याय होता. रणवीर मोठ्या पडद्यावर खिलजीच्या रुपात सर्वांसमोर आला, तेव्हा सगळेच त्याच्या अभिनयाचे चाहते झाले.