Farah Khan Latest Interview : बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिचा जवळचा मित्र आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तिला प्रत्येक चित्रपटानंतर एक कार भेट देतो. नुकतीच तिने अर्चना पूरण सिंह हिच्या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत हजेरी लावली होती. यावेळी तिने शाहरुख खानशी संबंधित एक किस्सा सांगितलं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...
अभिनेत्री अर्चना पूरण सिंहने फराह खानला विचारले की, 'तिला सेलिब्रिटीकडून मिळालेली सर्वात सुंदर भेट कोणती आहे? प्रत्युत्तरादाखल तिने खुलासा केला की, शाहरुख तिच्यासोबतच्या प्रत्येक चित्रपटानंतर तिला एक कार भेट देतो. आता नवीन कारची वेळ आली आहे, असा म्हणत तिने लवकरच त्याच्यासोबत आणखी एक चित्रपट करण्याची इच्छा गंमतीशीर अंदाजात व्यक्त केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना पूरण सिंहने हा व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फराह खान अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठीसोबत संभाषणाचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी अर्चना फराहच्या घराचे कौतुक करत म्हणते की, फराह एका आलिशान ट्रिपलेक्समध्ये राहते आणि तिच्या घरात एक गरम पाण्याचा स्विमिंग पूल आहे. हे ऐकून परमीत फराहला विचारतो की, तिने अक्षय कुमारकडून घर विकत घेतले आहे का? तेव्हा अर्चना गमतीने विचारते की, 'अक्षयने तुला गिफ्ट केले का?' मात्र, फराहने याला नकार दिला.
त्यानंतर अर्चनाने फराहला तिला कोणत्याही स्टारने दिलेल्या सर्वात महागड्या गिफ्टबद्दल विचारले, ज्यावर फराहने उत्तर दिले, 'हो, शाहरुख खान मला प्रत्येक चित्रपटानंतर कार भेट म्हणून देतो. आता आणखी एक चित्रपट बनवावा लागेल, कारण नवीन गाडी घेण्याची वेळ आली आहे.' अर्चना जेव्हा फराहला पती शिरीष कुंदरने दिलेले सर्वात चांगले गिफ्ट कोणते आहे, असे विचारले तेव्हा फराह खान गंमतीशीर अंदाजात म्हणाली की, 'माझी ३ मुले. ही सर्वात चांगली भेट आहे. आता ते कॉलेजला गेल्यावर कळेल की, त्यांची फी भरायची आहे. म्हणूनच मी आधीच युट्यूब चॅनल तयार केले आहे'.
संबंधित बातम्या