
Ambani Pre-Wedding Viral Video : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा हा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट होता. या लग्न सोहळ्यात बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार आणि उच्चपदस्थ व्यक्ती सामील झाल्या होत्या. हा परी-वेडिंग सोहळा जामनगर, गुजरातमध्ये पार पडला होता. आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची डॉक्युमेंटरी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली आहे. यात शाहरुख खान आरती करताना दिसला आहे. तर, ऐश्वर्या आणि अभिषेक देखील एकत्र दिसले होते.
अनंत आणि राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी जामनगरला गेलेल्या प्रत्येक मोठ्या सेलिब्रिटीची झलक या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा मुंबईत पार पडला, तेव्हा ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही बच्चन कुटुंबासोबत दिसल्या नव्हत्या. त्या दोघेही स्वतंत्रपणे या सोहळ्याला पोहोचल्या होत्या. जेव्हा हे प्रकरण सार्वजनिकरित्या चर्चेत आले, तेव्हा लोक असा अंदाज बांधू लागले की, ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात कदाचित तेढ चालले असावेत. इतकंच काय तर, ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार आहेत, असे देखील बोलले जाऊ लागले. मात्र, आता अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या डॉक्युमेंटरीमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र डान्स करताना पाहून, त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. यात ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्यासोबत ढोल-ताशांच्या तालावर डान्स करताना दिसले आहे. तर, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन एकत्र बसून या सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
या सोहळ्यातील एका व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच अभिनेता शाहरुख खान हा कार्यक्रम संपल्यानंतर महाआरती करताना दिसला आहे. यावेळी शाहरुख खान आपला धाकटा मुलगा अबराम आणि पत्नी गौरीसोबत पूजा करताना दिसला. शाहरुख खानचा लूक सगळ्यांनाच खूप आवडला आहे. त्याच्या या साध्या पण सुंदर लूकने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगर फंक्शनचा ट्रेलर सध्या खूप व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या
