Shah Rukh Khan: ‘त्या’ ८ माजी नौसैनिकांच्या सुटकेत शाहरुख खानचा हात? अखेर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘त्या’ ८ माजी नौसैनिकांच्या सुटकेत शाहरुख खानचा हात? अखेर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं

Shah Rukh Khan: ‘त्या’ ८ माजी नौसैनिकांच्या सुटकेत शाहरुख खानचा हात? अखेर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं

Feb 13, 2024 07:24 PM IST

Shah Rukh Khan On Subramanian Swamy: कतारमधील तुरुंगात असलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानचा हात असण्याच्या दाव्यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले आहे.

Shah Rukh Khan On Subramanian Swamy
Shah Rukh Khan On Subramanian Swamy

Shah Rukh Khan On Subramanian Swamy: कतारने सोमवारी (१२ फेब्रुवारी) त्यांच्या तुरुंगात असलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली. यापैकी सात नौसैनिक देशात परतले आहेत. या दरम्यान, मंगळवारी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला की, हे नौसेना अधिकारी भारतात परतण्यामागे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मात्र, आता शाहरुख खान याने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. यावर शाहरुख खानच्या वतीने स्पष्टीकरण देखील देण्यात आले आहे.

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. कतारमधील तुरुंगात असलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानचा हात असण्याच्या दाव्यासंदर्भात हे निवेदन जारी करण्यात आले आहे. शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिने जारी केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, 'या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याच दावा पूर्णपणे खोटा आहे. शाहरुख खानचा या प्रकरणात सहभाग असल्याच्या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनीही नकार दिला आहे.’

Tharala Tar Mag 13th Feb: चैतन्यला चुना लावून साक्षी शोधणार केसची फाईल; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ट्वीस्ट

यात त्यांनी म्हटले की, ‘कतारमधून नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात शाहरुख खानचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याचा यात कोणताही सहभाग नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. ही सुटका केवळ भारत सरकारमुळेच झाली आहे. शाहरुख खान यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्याच वेळी, आम्हाला हे देखील सांगायचे आहे की, केवळ आपल्या देशातील नेत्यांनाच मुत्सद्दीपणा आणि राज्यशास्त्र चांगले माहित आहे. मिस्टर शाहरुख खान इतर भारतीयांप्रमाणे, नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षित परतण्यामुळे आनंदी झाले आहेत.’

काय म्हणालेले सुब्रमण्यम स्वामी?

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला उत्तर देताना लिहिले होते की, ‘पंतप्रधान मोदींनी शाहरुख खानला आपल्यासोबत कतारला घेऊन जावे कारण परराष्ट्र मंत्रालय आणि एनएसए कतारच्या शेखांना पटवण्यात अपयशी ठरले आहेत. पीएम मोदींनी पुन्हा शाहरुख खानला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. अशा प्रकारे माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी कतारच्या शेखांशी तडजोड झाली.’

येत्या दोन दिवसांत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संयुक्त अरब अमिराती अर्थात युएइ आणि कतारला भेट देणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. यामुळे या देशांसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, असे देखील त्यांनी म्हटले होते. याच पोस्टवर प्रतिक्रिया देताना सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणात शाहरुख खान याचा हात असल्याचा दावा केला होता.

Whats_app_banner